HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर विधानपरिषदेवर जाणार का? संजय राऊतांनी दिले उत्तर…

मुंबई | राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या यादीत कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. यात विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या १२ सदस्यांच्या नियुक्तीसाठी बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या नावाची चर्चा सध्या सुरु आहे. उर्मिला मातोंडकरला शिवसेनेकडून विधानपरिषेदेची उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. दरम्यान सदस्यांच्या नियुक्तीसाठी शिफारस करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.

“यासंदर्भात मीदेखील चर्चा ऐकत आहे. हा निर्णय मंत्रीमंडळाचा असतो. मंत्रीमंडळात निर्णय घेतले जातात आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना यासंदर्भात मंत्रीमंडळाने अधिकार दिले आहेत”. संजय राऊत यांनी यावेळी बिहारमधील मुंगेर हिंसाचारावर भाष्य केलं आहे. हा हिंदुत्वावर हल्ला असल्याचं ते म्हणाले आहेत. “पण आतापर्यंत ना राज्यपालांनी, ना तेथील भाजपने यासंबंधी प्रश्न उपस्थित केले आहेत. मी तर महाराष्ट्राच्या राज्यपालांना तेथील राज्यपालांशी चर्चा करा अशी विनंती करणार आहे. तेथील सरकारचे प्रमुख धर्मनिरपेक्ष झाले का असं विचारा? असं सांगणार आहे,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

राज्यपाल नामनिर्देशित विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या १२ सदस्यांच्या नियुक्तीसाठी शिफारस करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. मात्र राज्यपालांना पाठविण्यात येणाऱ्या यादीत नेमकी नावे कोणाची आहेत, याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये विधान परिषदेच्या १२ जागांचे समान वाटप करण्यात आले आहे. तीनही पक्षांत विशेषत: काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विधान परिषदेवर वर्णी लागण्यासाठी इच्छुकांची गर्दी होती. त्यातून दोन्ही पक्षांनी प्रत्येकी चार नावे निश्चित केल्याचे समजते. शिवसेनेचीही चार नावे निश्चित झाल्याचे म्हटले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसांत अंतिम करणार!  – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

महाराष्ट्रबंदची हाक दिली नसती तरीही महाराष्ट्र स्वयंस्फुर्तीने बंद झाला असता ”रामदास आठवले यांचे प्रत्युत्तर

News Desk

१२वी पेपर तपासणीत असहकाराचा इशारा

News Desk