HW News Marathi
महाराष्ट्र

मोहम्मद पैगंबरांचा प्रेम, दया, शांती, त्यागाचा संदेश सर्वांनी आचरणात आणून मानवतेच्या कल्याणाचा विचार पुढे घेऊन जाऊया 

मुंबई | प्रेषित मोहम्मद पैगंबरांचा प्रेम, दया, शांती, त्यागाचा संदेश सर्वांनी आचरणात आणून मानवतेच्या कल्याणाचा विचार पुढे घेऊन जाऊया, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘ईद-ए-मिलाद’ निमित्ताने शुभेच्छा देताना केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला ‘ईद-ए-मिलाद’ निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रेषित मोहम्मद पैगंबरांच्या जन्मदिनानिमित्ताने साजरा होत असलेला ‘ईद-ए-मिलाद’चा सण हा समाजात प्रेषित मोहम्मद पैगंबरांचा एकता, समता, बंधुता, सौहार्दाचा संदेश घेऊन जाईल. मानवतेच्या कल्याणासाठी सर्वांना प्रेरीत करील असे ईद-ए-मिलाद’निमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘ईद-ए-मिलाद’चा सण साजरा करीत असताना आपण सर्वांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे, सोशल डिस्टन्सिंगंचे, स्वत:ची, कुटुंबाची, समाजाच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशातील कोरोना परिस्थिती हाताळण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सपशेल अपयशी ठरले आहेत – नाना पटोले

News Desk

नाशिकमध्ये अजित पवारांविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या मराठा कार्यकर्त्यांना अटक

News Desk

उद्यापासून सुरू होणार राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन

News Desk