HW News Marathi
Covid-19

राज्यपाल आमचे मार्गदर्शक, ते आम्हाला कायमच प्रिय !

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज (२३ मे) महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे. राज्यात एकीकडे महाविकासआघाडीचे सरकार आणि राज्यपालांमध्ये धुसफूस सुरु असताना आता संजय राऊत यांनी चक्क राज्यपालांचे कौतूक केल्याचे पाहायला मिळाले आहे. “राज्यपाल आमचे मार्गदर्शक आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून आमची भेट झाली नव्हती. म्हणून आज मी त्यांची सदिच्छा भेट घेतली आहे”, असे संजय राऊत यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. त्याचप्रमाणे, “राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमधील संबंध हे पिता-पुत्राप्रमाणेच असतात. ते तसेच आहेत आणि तसेच राहतील. राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यातील संबंधही अत्यंत मधुर आहेत. या दोघांना एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर आहे.आमच्यात कोणतीही दुही नाही”, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

संजय राऊत आणि राज्यपाल कोश्यारी यांच्या या भेटीमागचे खरे कारण मात्र अद्यापही स्पष्ट होऊ शकलेले नाही. दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीदरम्यान राज्यपालांच्या निर्णयाबाबत संजय राऊत यांनी अत्यंत उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली होती. ट्विटरच्या माध्यमातून संजय राऊत यांनी राज्यांपालांवर जोरदार निशाणा साधला होता. मात्र, आता अचानक संजय राऊत यांनी घेतलेल्या सदिच्छा भेटीमुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावलेल्या पाहायला मिळत आहे. आता राज्यपाल इतके प्रिय कसे झाले ? असा प्रश्न प्रसारमाध्यमांकडून विचारण्यात आल्यानंतर “राज्यपाल हे प्रियच असतात, राज्याचे पालक असतात. मुख्यमंत्र्यांनाही त्यांचबद्दल आदर आणि प्रेम आहे. त्यांच्याच कोणतेही मतभेद नाही”, असे उत्तर संजय राऊत यांनी दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना रुग्ण संख्येच्या बाबतीत भारताने इटलीला टाकले मागे

News Desk

MPSC परिक्षा कधी होणार ? मुख्यमंत्री कार्यालयाने दिली माहिती

News Desk

क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर रुग्णालयात दाखल

News Desk