HW News Marathi
महाराष्ट्र

राज ठाकरेंच्या सभेसाठी मैदान मिळत नाही

पुणे | विधानसभा निवडणुकीसाठी सर्व उमेदवारांनी त्याचे अर्ज दाखल केले आहे. यानंतर आता सर्व राजकीय पक्षांनी प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे ९ ऑक्टोबरपासून सभा घेऊन प्रचारचा नारळ फोडणार आहे. मात्र, राज ठाकरेंच्या मनसेची पहिली प्रचार सभा कसबा मतदारसंघात होणार आहे. त्यासाठी मनसेने टिळक रोड व शनिवार पेठ भागातील रमणबाग शाळेकडे परवानगी मागितली होती. मात्र ही परवानगी नाकारण्यात आली आहे.

पुणे शहरातील शैक्षणिक संस्थांवर सध्या सत्ताधारी पक्ष आणि त्याच्याशी संबंधित संघटनांचे वर्चस्व असल्याने इतर राजकीय पक्षांना मैदानेच मिळत नसल्याचा आरोप मनसेचे शहराध्यक्ष आणि कसबा पेठेतले उमेदवार अजय शिंदे यांनी केला आहे. तसेच मनसेला सभा घेण्यासाठी टिळक चौकाची जागा देण्यात यावी अशी विनंती मनसेने पोलीस आयुक्तांकडे केली आहे .

असदुद्दीन ओवेसी यांची रविवारी सभा झाल्यावर बुधवारी (९ ऑक्टोबर) राज ठाकरे यांच्या सभेचे नियोजन मनसेकडून करण्यात येत आहे. मात्र, ठाकरे यांच्या सभेसाठी मध्य वस्तीतील मैदान उपलब्ध होत नसल्याची तक्रार मनसेने केली आहे. ठाकरे यांच्या सभेसाठी शहराच्या मध्यवस्तीतील शैक्षणिक संस्थांच्या मैदानावर सभा घेण्याची परवानगी मागण्यात आली होती. पण परवानगी नाकारण्यात आली आहे. काही संस्थांनी तुमच्या सभेसाठी जागा देता येणार नाही, असा पवित्रा घेतला आहे .

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजभवनात भुताटकीचा वावर, एकदा शांतीयज्ञ करून घ्या, सेनेचा खोचक सल्ला 

News Desk

रामनवमी आणि हनुमान जयंती दिवशी महाराष्ट्रात जातीय दंगली झाल्या नाही, तुम्हाला याचे दुःख, मिटकरींचा राज ठाकरेंना टोला

Aprna

भीमा कोरेगाव प्रकरणी आरोपींना तुर्तास दिलासा, 12 सप्टेंबरपर्यंत नजरकैद

News Desk