HW News Marathi
Covid-19

‘महाराष्ट्र बचाव’ भाजपच्या आंदोलनाला ट्वीटवर ‘महाराष्ट्रद्रोही BJP’ ट्रेडिंगने प्रतिउत्तर

मुंबई | देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशात महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या आहे. ठाकरे सरकार कोरोनाचे संकट रोखण्यासाठी अपयश ठरले आहे. या पार्श्वभूमीवर आज (२२ मे) ‘माझे अंगण रणांगण’, ‘महाराष्ट्र बचाव’ अंतर्गत हे निषेध आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारविरोधात भाजपने सुरु केलेल्या आंदोनलावरून ट्वीटवर महाराष्ट्रद्रोही BJP हा ट्रेंड सुरू आहे.

सध्या ट्वीटवर #महाराष्ट्रद्रोहीBJP होत आहे. देशासह राज्यात कोरोनाचे संकट काळात भाजप ‘माझे अंगण रणांगण’, ‘महाराष्ट्र बचाव’ अंतर्गत हे निषेध आंदोलन करण्यात आले. यामुळे भाजपवर ट्वीटवर महाराष्ट्रद्रोही भाजप हे ट्रेंडिंग होत आहे. सर्वांनी एकत्र येऊन कोरोनाविरुद्धच्या लढा देण्याची गजर असताना भाजपच्या आंदोलनाला म्हणावे तितके यश आले नाही. उलट भाजपवर या आंदोलनामुळे टीका झाल्याचे सध्या ट्वीटवर दिसून येत आहे. तसेच ट्वीटवर सध्या भाजपविरोधात मिम्स देखील प्रचंड व्हायरस झाले आहे.

या आंदोलनात राज्यभरातील भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी आपआपल्या घराच्या अंगणात, कार्यालयाबाहेर काळ्या फिती बांधून, ठाकरे सरकारविरोधातील घोषणांचे फलक हातात घेऊन उभे राहिले. आज भाजपने महाराष्ट्र बचाव आंदोलन सुरू केले. आज सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंत घराच्याबाहेर उभे राहून काळ्या फिती, काळे झेंडे, रिबन आणि फलक उंचावून सरकारचा निषेध नोंदवला गेला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील सरकार विरोधात निषेध नोंदविला

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“पत्रकारांना फ्रंटलाइन वर्कर्स घोषित कराा”, महाविकासआघाडी आणि भाजप नेत्यांच्या मागणीनंतर आता मनसेचीही मागणी

News Desk

पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्या १० हजारांचा टप्पा पार करणार

News Desk

लॉकडाऊनमध्ये राज्यात आतापर्यंत तब्बल ६९ हजार गुन्ह्यांची नोंद

News Desk