HW News Marathi
Covid-19

कोरोना वॉरियर्ससाठी पीपीई किट तयार करणारा भारत बनला दुसरा देश

मुंबई | देशात कोरोना विरुद्धच्या लाढईत डॉक्टर, नर्से आणि वैद्यकीय कर्मचारी दिवस-रात्र आपले कर्तव्य बजावत आहे. कोरोना वॉरियर्सला सरक्षेसाठी महत्वाची भूमिका बजावणारे पीपीई कीट भारतात तयार केले जात आहे. यापूर्वी देशात पीपीई कीट तयार केले जात नव्हते. मात्र, कोरोनासारख्या संकटकाळात देशात पीपीई कीट करण्यास सुरुवात केली. आता पीपीई कीट बनवणाऱ्यांच्या यादीत भारत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

भारत दोन महिन्यात सर्वात कमी वेळीत स्वतंत्र पीपीई कीट बनवणारा जगातील दुसरा निर्माता ठरला आहे. भारताच्या अगोदर चीन आहे ज्यांनी सर्वाधिक पीपीई कीटची निर्मिती केली आहे, सरकारने काल (२१ मे) याबाबत माहिती देताना म्हणाले. तसेच पीपीई कीट बनविण्याच्या गुणवत्तेत वाढ करण्याचा प्रयत्न केले जात आहे.

देशातील कोरोना रूग्णांची संख्या १ लाख १८ हजार ४४७ आहे. यापैकी ३ हजार ५८३ लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर आतापर्यंत ४८ हजार ५३४ लोके बरे झाले आहेत. तसेच गेल्या २४ तासात ६०८८ नवीन रुग्ण वाढले आहेत. तर १४८ लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्या दररोज ५ हजारांच्या पुढे जात आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्याचे मुख्यमंत्री चांगले आहेत, पण… !

News Desk

दौंड-पुणे लोहमार्गावर प्रसंगावधान राखून मोठी दुर्घटना टाळल्याबद्दल, सुप्रिया सुळेंनी केले कौतुक

News Desk

आज देशात अनलॉक, तर ‘या’ राज्यात आणखी २ आठवडे वाढला लॉकडाऊन

News Desk