HW News Marathi
Covid-19

कशावर कोणाचा फोटो टाकायचा ते कळत नाही का ?

मुंबई | राज्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तणावाचे वातावरण असताना आता राजकारण पेटायला देखील सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या या आव्हानात्मक स्थितीत सध्या नागरिकांच्या मदतीसाठी अनेक राजकीय पक्ष, राजकीय नेते पुढे येत आहेत. मात्र, याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज (२१ मे) शिवसेनेवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरून शिवसेनेवर आणि आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेकडून कुलाबा विधानसभेच्या परिसरात महिलांसाठी वाटप करण्यात आलेल्या सॅनिटरी पॅड्सच्या पॅकेटवर कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला होता. त्यामुळे मनसेकडून अत्यंत बोचरी टीका करण्यात आली आहे.

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर याबाबतचा फोटोच पोस्ट केला आहे. “काय रे लाचारानो हे पण आधीच छापले होते का ? कशावर कोणाचा फोटो टाकायचा हे कळत नाही ? आता म्हणतील राजकारण नको”, अशा बोचऱ्या शब्दात संदीप देशपांडेंकडे शिवसेनेवर टीका करण्यात आली आहे. दरम्यान, आता हे प्रकरण समोर आल्यानंतर आदित्य ठाकरेंना मोठ्या टीकेचा सामना करावा लागू शकतो. यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरजूंना मदत करताना फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवण्यावर आक्षेप व्यक्त केला होता. ज्याला आपण मदत करत आहोत त्याचाच चेहरा दाखवून आपण त्याला लाजवत नाही का ?”, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला होता. दरम्यान, मनसेच्या या टीकेनंतर आता शिवसेना आणि आदित्य ठाकरेंकडून काही स्पष्टीकरण येणार का ? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

२४५ रुपयांच्या रॅपिड टेस्टिंग किटची खरेदी ६०० रुपयांना का?, विरोधकांचा केंद्र सरकारला सवाल

News Desk

#Lockdown : ‘वंदे भारत’चा दुसरा टप्पा १६ ते २२ मे असणार

News Desk

राजकीय ईर्षेपोटी राज्यकर्त्यांनी देशाचे स्मशान केले ! शिवसेनेचा घणाघात

News Desk