HW News Marathi
व्हिडीओ

Jitendra Awhad Vs Dipali Sayyad | जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात शिवसेनेकडून दिपाली सय्यद ..?

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात शिवसेनेचा उमेदवार ठरला आहे. शिवसेनेने काल रात्री उशिरा अभिनेत्री दिपाली सय्यद यांना शिनसेनेत सामील करून घेतले आहे. त्या मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे.दिपाली सय्यद यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी हातावर शिवबंधन बांधून शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. सय्यद यांच्या प्रवेशाने जितेंद्र आव्हाड यांन तगडे आव्हान मिळणार आहे. सय्यद यांना उमेदवारी देऊन शिवसेनेनी जातीय समीकरणे आणि सिनेक्षेत्रातली प्रसिद्धी या दोनही गोष्टींचा फायदा घेण्याचा प्रयत्न केलेला दिसत आहे.दिपाली सय्यद यांनी निवडणूक लढवण्याची पहिलीच वेळ नाही. या आधीही त्यांनी २०१४ ला अहमदनगर दक्षिणमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना आम आदमी पार्टीने उमेदवारी दिली होती. त्यानंतर त्यांनी विनायक मेटेंच्या शिवसंग्राम पक्षामध्ये प्रवेश केला होता. आणि आता त्या शिवसेनेच्या तिकिटावर जितेंद्र आव्हाडांना आव्हान देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.#JitendraAwhad #NCP #DipaliSayyad #Shivsena #UddhavThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…त्यांच्या तोंडाला कुणी आवर घालू शकत नाही; Sharad Pawar यांचा Raj Thackeray वर घणाघात

News Desk

‘Supriya Sule यांनी तारीख-वेळ ठरवावी’, राणेंनी स्वीकारलं आव्हान

Manasi Devkar

Rahul Gandhi | काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी कुणीही घेतली नाही !

News Desk