मुंबई | विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आज (३ ऑक्टोबर) दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत २० उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. या यादीत नांदगावमधून पंकज भुजबळ यांना तर सोलापुरात लक्ष लागून असलेल्या माढा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार बबन शिंदे यांनाच उमेदवारी दिली आहे. तर माळशिरसमधून स्व. हनुमंत डोळस यांच्या जागी उत्तम जानकर यांना संधी देण्यात आली आहे.
केंद्रीय निवड समितीच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधानसभा निवडणूक 2019 च्या पुढील 20 उमेदवारांची दुसरी यादी प्रदेशाध्यक्ष मा. आ. @Jayant_R_Patil यांनी जाहीर केली आहे. सर्व उमेदवारांना विजयासाठी हार्दिक शुभेच्छा!#NCP #candidates pic.twitter.com/6CC3Kwy0EY
— NCP (@NCPspeaks) October 3, 2019
विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारांच्या पहिली यादीत काल (२ ऑक्टोबर) जाहीर झाली होती. राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत ७७ जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, रोहित पवार, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड या दिग्गज नेत्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. आतापर्यंत शिवसेना, भाजप आणि काँग्रेस यांच्या दोन यादी जाहीर झाल्या आहेत. मात्र, राष्ट्रवादीची फक्त एकच यादी जाहीर झाली आहे. राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत ७७ जणांना उमेदवारी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादीच्या दुसऱ्या यादीतील उमेदवारांची नावे
- जळगाव शहर- अभिषेक पाटील
- बाळापूर – संग्राम गुलाबराव गावंडे
- कारंजा – प्रकाश डहाके
- मेळघाट – केवळराम काळे
- अहेरी – धर्मराजबाबा आत्राम
- दिग्रस – मो. तारीक मो. शमी
- गंगाखेड – मधूसुदन केंद्रे
- कन्नड – संतोष कोळगे
- नांदगाव – पंकज भुजबळ
- बागलाण – दीपिका चव्हाण
- देवळाली – सरोज अहिरे
- कर्जत – सुरेश लाड
- खेड आळंदी – दिलीप मोहिते
- मावळ – सुनील शेळके
- पिंपरी चिंचवड – सुलक्षणा शिलावंत
- आष्टी – बाळासाहेब आजबे
- माढा – बबनदाद शिंदे
- मोहोळ – यशवंत माने
- माळशिरस – उत्तमराव जानकर
- चंडगड – राजेश नरसिंग पाटील
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.