मुंबई | अमेरिका भारताला व्हेंटिलेटर्स दान करणार आहे, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीटद्वारे केली आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्वीट करत ट्रम्प यांचे आभार मानले होते. मात्र, अमेरिका भारताला व्हेंटिलेटर मोफत देणार नसून एका व्हेंटिलेटरसाठी अमेरिका भारताकडून जवळपास दहा लाख रुपये आकारले जाणार असल्याचे वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिले आहे.
अमेरिकेकडून हे व्हेंटिलेटर्स मे महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा जूनच्या सुरुवातीला भारतात येतील, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. अमेरिका भारताला मोबाईल व्हेंटिलेटर देणार असून एका व्हेंटिलेटरसाठी भारताला १३ हजार अमेरिकन डॉलर (९.६ लाख रुपये) ऐवढे पैसे मोजावे लागणार आहे. यामध्ये वाहतूक खर्च धरण्यात आलेला नाही. तर अमेरिका भारताला २०० व्हेंटिलेटर पाठवणार आहे. त्यासाठी भारताला २.६ मिलियन अमेरिकन डॉलर मोजावे लागणार आहेत. याशिवाय वाहतूक खर्च देखील भारताला द्यावा लागेल. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाखाच्या जवळ येवून पोहोचला आहे. तर अमेरिकेतला कोरोना रुग्णांचा आकडा १५ लाखांच्या पुढे गेला आहे.
https://twitter.com/realDonaldTrump/status/1261368451555360774?s=20
ट्रम्प ट्वीटमध्ये म्हणाले, “मला ही घोषणा करताना अभिमान होत आहे की, संयुक्त राष्ट्र भारताला व्हेंटिलेटर्सची मदत करणार आहे. या महामारी दरम्यान, आम्ही भारत आणि नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहोत. आम्ही लस तयार करण्यासाठीही मदत करत आहोत. आम्ही मिळून अदृश्य शत्रूला हरवणार आहोत.” “कोरोना संकटकाळात आपण एकत्र काम करू. यामुळे भारत-अमेरिकेची मैत्री आणखी घट्ट होईल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. यावेळी संपूर्ण जगांनी एकत्र येवून कोरोनाविरुद्ध लढ दिला पाहिजे. यामुळे भारत-अमेरिकेची मैत्री आणखी घट्ट होईल,” असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.
Thank you @POTUS @realDonaldTrump.
This pandemic is being fought collectively by all of us. In such times, it’s always important for nations to work together and do as much as possible to make our world healthier and free from COVID-19.
More power to 🇮🇳 – 🇺🇸 friendship! https://t.co/GRrgWFhYzR
— Narendra Modi (@narendramodi) May 16, 2020
संबंधित बातम्या
अमेरिका भारताला व्हेंटिलेटर्सची मदत करणार | डोनाल्ड ट्रम्प
भारत-अमेरिका ‘कोरोना’वर लस विकसित करणार !
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.