HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळूनही नमिता मुंदडा यांचा भाजपमध्ये प्रवेश

बीड | विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतरही राष्ट्रवादी-काँग्रेसची गळती थांबलेली दिसत नाही. राष्ट्रवादीच्या केजच्या उमेदवार नमिता मुंदडा यांनी आज (३० सप्टेंबर) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थिती भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे बीडमध्ये आले असता त्यांनी बीडमधील उमेदवारांची यादी जाहीर केली होती.

पवार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना राष्ट्रवादीच्या पाच उमदेवारांची घोषणा केली होती. यात परळीतून धनंजय मुंडे, बीडमधून संदीप क्षीरसागर, माजलगावमधून प्रकाश सोळके, गेवराईतून विजयसिंह पंडित आणि केजमधून नमिता मुंदडा यांना उमेदवारी दिली होती. मात्र, राष्ट्रवादीने उमेदवारी दिली असताना देखील नमिता यांनी पक्ष सोडला.

भाजपमध्ये प्रवेश करण्या पूर्वी त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना एक ओळीचे राजीनामा पत्र पाठवले आहे. नमिता यांनी गेल्या अनेक दिवसांपासून निमिता या भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. यानंतर निमता मुंदडा यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी जमिनीचे पट्टे देणार! – विजय वड़ेट्टीवार

Aprna

“मोदी सरकार आणि योगी सरकार बरखास्त करा” – नाना पटोले

News Desk

मुख्यमंत्र्याच्या भूमिकेविरोधात काँग्रेस नेत्याचं थेट राज्यपालांना पत्र

News Desk