HW News Marathi
व्हिडीओ

पवार म्हणत असतील, ‘अरे या वयात मी इतका फिरतो आणि तू…’ ! चंद्रकांत पाटलांचा ठाकरेंवर निशाणा

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पुण्यातील कोथरूडमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने माध्यमांशी बोलत होते. यावेळी चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्री आणि राज्य सरकारवर तोंडसुख घेतले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धावता प्रवास करून उपयोग नाही, असे म्हणत चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यावर निशाणा साधलाय. तर देवेंद्र फडणवीस यांचा प्रवास हा शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी, शेतकऱ्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी आहे, असे म्हणत विरोधी पक्षनेत्यांचं कौतुक केलंय. शरद पवारांना वारंवार मुख्यमंत्र्यांची भलावण करावी लागते, याच वाईट वाटते असे म्हणत मुख्यमंत्र्यांची पाठराखण करणारी शरद पवारांवर यावेळी चंद्रकांत पाटलांनी निशाणा साधला. तर

“नाथाभाऊ कुठेही जाणार नाहीत.त्यांची मनधरणी सुरुये” असे सांगत खडसेंच्या पक्षांतराच्या चर्चांना त्यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. केंद्राकडे मदत मागितली तर बिघडलं कुठे असा सवाल काल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला त्यावर “उठसुठ केंद्र-केंद्र काय सुरुये ? सगळी मदत केंद्राने केली तर राज्य सरकार काय करणार”, असा प्रतिप्रश्नही चंद्रकांत पाटलांनी विचारला. चंद्रकांत पाटील या पत्रकार परिषदेत नेमके काय म्हणाले ? पाहुया

#ChandrakantPatil #SharadPawar #UddhavThackeray #DevendraFadnavis #Maharashtra #BJP #NCP #Shivsena #MahaVikasAghadi #CMUddhavThackeray
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खासदार Prataprao Jadhao यांचा पुन्हा एकदा गौप्यस्फोट

Chetan Kirdat

Zomatoची नवी सेवा म्हणजे डिलिव्हरी बॉयच्या जीवाशी खेळ!- Rohit Pawar

News Desk

Rahul Gandhi यांच्या विरोधात Mangesh Kudalkar आक्रमक

Seema Adhe