नवी दिल्ली | अखेर मुंबईतील महिलांना लोकलमधून प्रवास करण्याच्या मागणीला रेल्वेने परवानगी दिली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी अखेर महिलांना लोकलमधून उद्यापासून (२१ ऑक्टोबर) प्रवास करण्यास मुभा देण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. गोयल यांनी तसं ट्विटच केलं आहे. सर्व महिला प्रवाशांना उद्यापासून सकाळी ११ ते दुपारी ३ दरम्यान आणि सायंकाळी ७ नंतर मुंबई उपनगरीय ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत आहे.
“मला घोषित करण्यास आनंद होत आहे की, उद्यापासून सर्व महिला प्रवाशांना स.11 ते दु.3 दरम्यान व सायं.7 नंतर मुंबई उपनगरीय ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत आहे.रेल्वेची नेहमीच तयारी होती त्यामुळे आज मिळालेल्या महाराष्ट्र शासनाच्या पत्रानुसार आम्ही त्वरित परवानगी देत आहोत”, असे ट्विट पीयूष गोयल यांनी केले आहे.
मला घोषित करण्यास आनंद होत आहे की, उद्यापासून सर्व महिला प्रवाशांना स.11 ते दु.3 दरम्यान व सायं.7 नंतर मुंबई उपनगरीय ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत आहे.रेल्वेची नेहमीच तयारी होती त्यामुळे आज मिळालेल्या महाराष्ट्र शासनाच्या पत्रानुसार आम्ही त्वरित परवानगी देत आहोत.
— Piyush Goyal (@PiyushGoyal) October 20, 2020
महिलांना लोकलचा प्रवास करु द्यावा यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा रेल्वे बोर्डाला पत्र लिहिले आहे. नवरात्रीच्या एक दिवसाआधी राज्य सरकारने सरसकट सगळ्या महिलांना लोकल प्रवासाला संमती दिल्याचे जाहीर केले होते. मात्र रेल्वे बोर्डाने यासंदर्भातली संमती नाकारली होती. मुंबई आणि उपनगरांमधून प्रवास करणाऱ्या महिलांची आता प्रवासाचा पेच सुटला असे वाटत असतानाच रेल्वेने परवानगी नाकारल्याने हिरमोड झाला. अशात आता राज्य सरकारने पुन्हा एकदा रेल्वे बोर्डाला विनंती करणारं पत्र पाठवले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.