HW News Marathi
मुंबई

महापौरांचा मुख्यमंत्र्यांवर पावसाळी घणाघात

मुंबई | मुंबईत पावसाला जोरदार सुरूवात झाली असुन सत्ताधाऱ्यांमध्ये देखील आरोप-प्रत्यारोपांना प्रारंभ झाल्याचे पहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महापालिकेच्या कामात ढवळाढवळ करत असल्याचा आरोप मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला आहे. मुंबईत पावसामुळे दरवर्षी पाणी तुंबते व दरवर्षी त्यावर उपाय योजले जातात ज्यामुळे शिवसेना-भाजप एकमेकांना पाण्यात पाहते. याच मुद्दयावरुन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाना साधला आहे.

‘मंत्रालयात महापालिकेच्या प्रश्नांबाबत बैठक असेल तर पालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना बोलवले जाते. आपत्कालीन व्यवस्थापनाच्या बाबत जी बैठक आयोजित केली होती त्या बैठकीत मुंबईच्या महापौरांना आमंत्रित केले असते, तर राज्य सरकारच्या अखत्यारित येणारी जी प्राधिकरणं कामेकरत नाहीत, त्यांच्याविषयी प्रश्न मांडले असते. म्हणजे पावसाळ्यात मुंबईकरांना होणारा त्रास कमी झाला असता’, असे महापौर म्हणाले.

महाराष्ट्राचा प्रथम नागरिक म्हणून व मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करु शकतात, मात्र मुंबईचा प्रथम नागरिक म्हणून महापौरांना बैठकीतील निर्णयांबाबत माहिती देणे आवश्यक असते व मुख्यमंत्री महापालिकेच्या कामात ढवळाढवळ करत असल्याचा आरोप महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांचा जर पालिका अधिकाऱ्यांवर दबाव असेल तर कामात व्यत्यय येऊ शकतो तसेच मुख्यमंत्री जाणीवपूर्वक कामात हस्तक्षेप करत आहेत का हे समजत नसल्याचेही महाडेश्वर म्हणालेत. तसेच मुंबईचे पालिका आयुक्त अजॉय मेहता हे देखील हुकूमशहा असल्याचा घणाघात महाडेश्वरांनी केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

परफ्यूम एक्सपर्ट मोनिका घुरडेच्या खूनाचा छडा

News Desk

फडणवीस सरकारचे सर्वच आलबेल, सामना,तून टीका

News Desk

शनिवार ठरला अपघातवार एक दिवस.. 7 अपघात.. 30 ठार..

Adil
देश / विदेश

कुख्यात डॉन अबु सालेमच्या अडचणीत वाढ

News Desk

दिल्ली | दिल्लीत राहणारे व्यावसायिक अशोक गुप्ता यांना ५ कोटी रुपयांची मागणी करत जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी कुख्यात डॉन अबु सालेम यास दिल्ली सत्र न्यायालयाने खंडणीप्रकरणी ७ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. अबु सालेम सध्या ऑर्थर रोड येथील मुंबई मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे.

१९९३मध्ये मुंबईत झालेले साखळी बॉम्बस्फोट प्रकरण आणि १९९५ मध्ये बांधकाम व्यावसायिक प्रदीप जैन यांची झालेली हत्या या दोन्ही प्रकरणात सालेम तुरुंगात शिक्षा भोगत आहे. दरम्यान, त्याने २००२ मध्ये दक्षिण दिल्लीत राहणारे व्यावसायिक अशोक गुप्ता यांना जीवे मारण्याची धमकी देत ५ कोटी रुपयांची मागणी केली होती. याच प्रकरणा बाबत गुरुवारी (आज) निकाल देत दिल्ली सत्र न्यायालयाने सालेमला ७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

Related posts

#CoronaVirus | राज्याची चिंता वाढली, कोरोनाबाधितांचा आकडा ४०० पार

News Desk

#PulwamaAttack : गृहमंत्री राजनाथ सिंह श्रीनगरकडे रवाना

News Desk

प्रसिद्ध गायक केके काळाच्या पडद्याआड; पार्थिवाचे आज शवविच्छेदन केल्यानंतर मृत्यूचे गूढ उलघडेल

Aprna