HW News Marathi
मुंबई

परफ्यूम एक्सपर्ट मोनिका घुरडेच्या खूनाचा छडा

मुंबईः प्रसिद्ध परफ्युम एक्सपर्ट मोनिका घुरडे हिची मागील वर्षी गोव्या निर्घृण हत्या करण्‍यात आली होती. या प्रकरणी आरोपीने धक्कादायक खुलासे केले आहेत. मोनिका घर बघायला आली होती तेव्हाच ती त्याच्या मनात भरली होती. तिला सोडले तर पोलिसांना सगळी हकिकत सांगेल, अशी भीती असल्याने तोंडावर उशी ठेवून तिला ठार मारले. त्यापूर्वी तिला तीन पॉर्नफिल्म दाखवल्या. त्यानंतर हातपाय बांधून बलात्कार केला. मोनिकाच्या हत्येनंतर पोलिसांनी सोसायटीचा 21 वर्षीय सुरक्षा रक्षक राजकुमारसिंग याला अटक केली होती.

राजकुमारला ती आवडली होती. तिच्यासोबत बोलण्याचा तो प्रयत्न करायचा. तिला वारंवार बघायचा. तिचा संपूर्ण शेड्युल त्याला माहिती होता. घरात प्रवेश केल्यावर राजकुमारने मोनिकाला चाकूचा धाक दाखवला. तिला बळजबरी बाथरुममध्ये घेऊन गेला. यावेळी झालेल्या झटापटीत तिची शुद्ध हरपली. त्यानंतर त्याने तिला ओढत बेडरुममध्ये नेले. बेडला तिचे हात पाय बांधले. या दरम्यान ती शुद्धीवर आली. त्याने तिच्याकडे पैशांची मागणी केली. तिने पर्समधील चार हजार रुपये घेण्यास सांगितले. त्यानंतर एटीएम कार्डही त्याच्या सुपूर्त केले. त्याने तिच्याकडून एटीएम पीन आणि मोबाईलचा पासवर्ड घेतला. तिने त्याला सोडण्याची विनंती केली. पण राजकुमारने तिला तीन पॉर्नफिल्म दाखवल्या. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. ही घटना ती पोलिसांना सांगेल अशी त्याला भीती होती. त्याने उशीने तोंड दाबून तिची हत्या केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वरळी समुद्रात बोट बुडाली, १ जण बेपत्ता

News Desk

मांजर फेकल्याच्या जाब विचारला म्हणून महिलेचा खून

News Desk

मालगाडीवर चढून सेल्फी काढताना १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

News Desk