HW News Marathi
महाराष्ट्र

रोज या सरकारचा बचाव करणं एवढचं काम पवारांकडे आहे! 

बारामती | राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस बारामती दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान फडणवीसांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत मांडलेल्या काही मुद्यांचे खंडन करत उत्तर दिले आहे. महाराष्ट्र सरकारचा नाकर्तेपणा समोर आला असून सरकारचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी सरकारचा बचाव करण्याचं एकमेव काम शरद पवार यांना उरलं आहे, अशी टीका राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तुळजापूरमधील गव्हर्न्मेंट सर्किट हाउस येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री घरातून का काम करतात यासंदर्भातील स्पष्टीकरण दिले होते. त्यावरच बोलताना फडणवीस यांनी पवार फक्त सरकारचा बचाव करण्याचं काम करत असल्याचा टोला लगावला आहे.

तुम्ही मुख्यमंत्री म्हणून काम करा आम्ही सदस्य म्हणून बाहेर जाऊन काम करु असं पवारांनी म्हटल्याचं सांगत यासंदर्भातील प्रतिक्रिया फडणवीस यांना पत्रकारांनी विचारली. “पवारांना या सरकारचा बचाव करावा लागत आहे. या सरकारचा नाकर्तेपणा बाहेर येत आहे.. त्यामुळे असंतोष तयार झालेला आहे. त्यामुळे रोज या सरकारचा बचाव करणं एवढचं काम पवारांकडे आहे,” असं फडणवीस म्हणाले. राज्य सरकारचे अनेक पालकमंत्री आमचा दौरा घोषित झाल्यानंतर जनतेच्या भेटीला गेले. या सरकारने आमचे दौरे घोषित झाल्यानंतर दौऱ्यांचा कार्यक्रम जाहीर केला अशी टीकाही फडणवीस यांनी केली. सरकारने शेतकऱ्यांना तातडीची मदत करावी अशी मागणी करताना पंचनाम्यांची वाट बघत बसू नये असंही फडणवीस म्हणाले आहेत.

महाराष्ट्रातील शेतकऱ्याला टोलवाटोलवी नको आहे. राज्य सरकार काय करणार आहे हे स्पष्टपणे सांगावे अशी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मागणी असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. राज्यपालांचे एखादे वाक्य आणि त्यावरील विवाद यावर वाद करत बसण्याची ही वेळ नसल्याचेही फडणवीस यांनी म्हटलं आहे. “सरकारने पहिल्यांदा शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे. शेतकरी एवढ्या गंभीर परिस्थितीमध्ये आहे. तुमचे राज्यपालांसोबत जे काही मतभेद असतील ते चालत राहतील. याच्या पूर्वीही असं झालं आहे. आम्ही देखील हे पाहिलं आहे. राज्यपालांबरोबर यापूर्वीही मतभेद झालेत. त्यामुळे आता तो विषय नसून शेतकऱ्याला काय मदत मिळणार हे महत्वाचं आहे,” असं फडणवीस म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

9 वर्षात 7.58 लाख मुंबईकरांनी एमटीएनएलच्या लँडलाईन सेवेस ठोकला रामराम

News Desk

राजभवन मुंबई येथील नव्या दरबार सभागृहाचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्‌घाटन

News Desk

राज्यातील १० हजार किलोमीटर्सच्या ग्रामीण रस्त्यांची कामे होणार

News Desk