HW News Marathi
महाराष्ट्र

शिंवेंद्रराजे आणि माझ्या भेटीत काही काळबेरं नाही, अजित पवारांची प्रतिक्रिया

पुणे | आज (१६ ऑक्टोबर) उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याच्या दौऱ्यावर असताना तिथे त्यांनी साताऱ्याचे भाजप आमदार शिवेंद्रराजे यांची भेट घेतल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यावर स्वत: अजित पवारांनी उत्तर दिले आहे. “सातऱ्यातील भाजप आमदार शिवेंद्रराजे विकास कामासाठी आले होते. त्यात काहीही काळबेरं नाही,” अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

“शिवेंद्रराजे हे विकास कामासाठी भेटून गेले. या अशा भेटी होत राहतात. त्यामुळे असा काही अर्थ काढू नका. त्यात काहीही काळबेरं नाही,” असे अजित पवार म्हणाले आहेत.

राजकीय वर्तुळात सध्या सत्ताधारी पक्षातील नेते आणि विरोधी पक्षातील नेते भेटले की चर्चांना उधाण येते. असेच काहीसे उधाण पुन्हा एकदा आले आहे. साताराचे भाजप आमदार शिवेंद्रराजे यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात शिवेंद्रराजे आणि अजित पवार यांच्यात भेट झाली. या बैठकीत जवळपास तासभर चर्चा झाली. शिवेंद्रराजे अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला आल्यानं राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यापूर्वीही शिवेंद्रराजे यांनी अजित पवार यांची अशाप्रकारे भेट घेतली होती.

त्यांच्या या बैठकीत विविध राजकीय विषयांवर चर्चा सुरु असल्याचं बोललं जात आहे. मात्र ही भेट नेमकी कशासाठी आहे, याचं नेमकं कारणं अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान, ही भेट वैयक्तिक कारणासाठी असल्याचं शिवेंद्रराजे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज (१६ ऑक्टोबर) पुणे दौऱ्यावर आहेत. ते आज विभागीय आयुक्त कार्यालयात नागरिकांची भेट घेणार आहेत. तर दुपारी अजित पवारांच्या उपस्थितीत कोरोनाच्या स्थितीबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रिलायन्स जिओतर्फे विद्यापीठास फ्री वाय-फाय सेवा

News Desk

जाणून घ्या…राज्यात कोणत्या समाजाला किती टक्के आरक्षण

News Desk

‘महिला सुरक्षणासाठी मनसेची धाव गृहमंत्र्यांकडे’ !

News Desk