HW News Marathi
महाराष्ट्र

रिलायन्स जिओतर्फे विद्यापीठास फ्री वाय-फाय सेवा

 

स्वारातीम विद्यापीठ आणि रिलायन्स जिओमध्ये झाला सामंजस्य करार स्वारातीमवि सलग्नित महाविद्यालयांनाही मिळणार ही सेवा

उत्तम बाबळे

नांदेड :-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि रिलायन्स जिओ इन्फोकॉम लि. या दोघांमध्ये बुधवार, दि.२९ मार्च रोजी सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार लवकरच विद्यापीठ परिसर आणि संलग्नित महाविद्यालयामध्ये जिओतर्फे मोफत वाय-फाय सेवा पुरविण्यात येणार आहे.

विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांच्या पुढाकाराने हा करार पार पडला. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. गणेशचंद्र शिंदे, कुलसचिव बी.बी.पाटील, जिओचे उपाध्यक्ष आर.व्ही. बालसुब्रम्हण्यम अय्यर, जिओचे वित्त व्यवस्थापक राम अण्णा पंताला, प्रा.डॉ.आर.एम. मुलानी, जनसंपर्क अधिकारी अशोक कदम, राजेश वणारे, बिजुकुमार गोपीनाथ, अरविंद अलाने, अजित शेलार यांची उपस्थिती होती.

या करारानुसार विद्यापीठ परिसरामध्ये सर्वे करण्यात येणार आहे. गरजेनुसार पायाभूत सुविधा उभारणी जीओमार्फतच करण्यात येणार आहे. दररोज वीस एमबी याप्रमाणे परिसरातील सर्व प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी विद्यार्थी यांच्यासह विद्यापीठ परिसरामध्ये आलेल्या अभ्यागतानाही हा डेटा मोफत वापरण्यास मिळणार आहे. जिओ ग्राहकांसाठी काही विशेष योजनाही राबविण्यात येणार आहेत. जागोजागी वाय-फाय युनिट उभे करून त्यांना फायबर कनेक्टिव्हीटीद्वारे जोडण्यात येणार आहे. जेणे करून विद्यापीठ परिसरामध्ये जीओची सेवा चांगल्याप्रकारे मिळणार आहे. याचधर्तीवर ही सेवा जीओतर्फे विद्यापीठाच्या सर्व संलग्नित महाविद्यालयांनाही पुरविण्यात येणार आहे. जीओकडे सर्व विभाग सक्षम असून लवकरात लवकर ही सेवा कार्यान्वित करण्यात येणार आहे, असे जिओ सेंटरचे व्यवस्थापक अजीत शेलार यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘छगन भुजबळांनी इम्पेरिकल डेटासाठी पुढाकार घ्यावा,’ आम्ही पाठिंबा देऊ भाजपा!

News Desk

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरवर २ ठिकाणी अपघात

swarit

आता विरोधी पक्षनेता निवडताना तो भाजपमध्ये येणार नाही याची काळजी घ्या !

News Desk