HW News Marathi
महाराष्ट्र

शिवेंद्रराजे आणि अजित पवार यांची पुण्यात भेट… राजकीय चर्चांना उधाण

पुणे | राजकीय वर्तुळात सध्या सत्ताधारी पक्षातील नेते आणि विरोधी पक्षातील नेते भेटले की चर्चांना उधाण येते. असेच काहीसे उधाण पुन्हा एकदा आले आहे. साताराचे भाजप आमदार शिवेंद्रराजे यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात शिवेंद्रराजे आणि अजित पवार यांच्यात भेट झाली. या बैठकीत जवळपास तासभर चर्चा झाली. शिवेंद्रराजे अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला आल्यानं राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यापूर्वीही शिवेंद्रराजे यांनी अजित पवार यांची अशाप्रकारे भेट घेतली होती.

त्यांच्या या बैठकीत विविध राजकीय विषयांवर चर्चा सुरु असल्याचं बोललं जात आहे. मात्र ही भेट नेमकी कशासाठी आहे, याचं नेमकं कारणं अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान, ही भेट वैयक्तिक कारणासाठी असल्याचं शिवेंद्रराजे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज (१६ ऑक्टोबर) पुणे दौऱ्यावर आहेत. ते आज विभागीय आयुक्त कार्यालयात नागरिकांची भेट घेणार आहेत. तर दुपारी अजित पवारांच्या उपस्थितीत कोरोनाच्या स्थितीबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंविरोधात भाजपाची पोलिसांत तक्रार!

News Desk

“रात्री कोणाला अटक झाली तर…”, चंद्रकांत पाटलांचं सूचक विधान

News Desk

केंद्र सरकार राज्यातील शेतकऱ्यांसाठी काही करणार आहे का ?

News Desk