HW News Marathi
महाराष्ट्र

कितीही स्ट्रॅटेजी करा, 2024 मध्ये येणार तर मोदीच, पवार-प्रशांत किशोर भेटीवर फडणवीसांचं वक्तव्य

नागपूर | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांच्यात शुक्रवारी तब्बल साडे तीन तास बैठक झाली. या बैठकीत 2024 च्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. भाजपविरोधात विरोधकांची मोट बांधण्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, या भेटीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार टोला हाणलाय. कुणी कितीही रणनिती आखा, पण आताही मोदी आहेत आणि 2024 लाही मोदीच असणार, अशा शब्दात फडणवीस यांनी पवार-किशोर भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीमध्ये 2024च्या लोकसभा निवडणुसाठी स्ट्रॅटेजी आखण्याबाबत चर्चा झाल्याची बोललं जात आहे. दरम्यान, प्रशांत किशोर यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कॅम्पेनची किंवा इतर कोणतीही जबाबदारी देण्यात आली नाही. मात्र, भाजपविरोधात आघाडी निर्माण करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ, असं राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आलंय. त्याबाबत विचारलं असता फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्र डागलं. कुणी कितीही रणनिती आखू द्या, आजही मोदी आहेत आणि 2024 लाही मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचीच सत्ता असेल, असा दावा फडणवीस यांनी केला आहे.

‘वारीला परवानगी द्यायला हवी होती’

कमी वारकऱ्यांच्या उपस्थितीत निघणाऱ्या पायी वारी करण्यासाठी वारकऱ्यांना परवानगी द्यायला हवी होती. मुळातच त्यांनी 50 लोकांच्या उपस्थितीत परवानगी मागितली होती. शिवाय मार्गात येणाऱ्या गावांचे ठरावही घेतले होते. त्यामुळे सरकारने पायी वारीला परवानगी द्यायला हवी होती, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीसांना पंकजा मुंडे म्हणतात, आनंद आहे!

News Desk

मुख्यमंत्री आज १.३० वाजता जनतेशी संवाद साधणार

News Desk

तिसऱ्या रेल्वे लाईनचे काम करताना शेतकऱ्यांच्या समस्या दुर्लक्षित नको! – सुनिल केदार

Aprna