HW News Marathi
राजकारण

विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह !

मुंबई | “विधानसभा निवडणुका लढवण्यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह आहे” असल्याचे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगतिले. मात्र, त्याबाबतचा निर्णय मनसे अध्यक्ष राज ठाकरेच घेतील, असे नांदगावकर यांनी सांगतिले. “ईव्हीएमबद्दल आमची शंका आहेच. निवडणूक लढण्याचा निर्णय झाला तर बहुतांश मतदारसंघात आम्ही स्वबळावर लढू,” अशी भूमिका नांदगावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आज (२० सप्टेंबर) बैठकीची माहिती दिली.

दरम्यान, मनसेचे विधानसभा निवडणूक १०० जागांवर लढविणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या विभाग प्रमुखांची मते जाणून घेण्यात आली. यासाठी ३६ विभाग अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्याकडून अहवाल मागविण्यात आला आहे, अशी माहिती नादंगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. नादंगावकर पुढे म्हटले, राज ठाकरे याबाबत सकारात्मक विचार करतील. अजून ही एकला चलोची भूमिका आहे. आतापर्यंत पक्षाने एकला चलोची भूमिका घेतलेली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राऊतांचा जामीन रद्द होणार? पत्राचाळ घोटाळाप्रकरणी आज हायकोर्टात सुनावणी

Chetan Kirdat

माणचे राष्ट्रवादीचे नेते शेखर गोरे आज शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार

News Desk

बंगालमध्ये घडलेला हिंसाचार भाजपप्रेरित । जयंत पाटील

News Desk