HW News Marathi
राजकारण

माणचे राष्ट्रवादीचे नेते शेखर गोरे आज शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यात पक्षांतराचे राजकारण पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माण विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे माजी नेते शेखर गोरे यांनी अखेर शिवबंधन बांधण्याचा निर्णय घेतला आहे. गोरे गुरुवारी (८ ऑगस्ट) मुंबईत दाखल झाले असून दुपारी तीन वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहे.

गोरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात अन्याय झाल्याचा आरोप करून त्यांनी खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनाच फलटण येथील कार्यक्रमात जाब विचारून राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत त्यांनी युतीचे उमेदवार खासदार रणजित निंबाळकर यांचे काम करून त्यांच्या पुढील राजकीय वटचालीची चुणूक दाखवली होती. मात्र, गोरे भाजपमध्ये जाणार की शिवसेनेत याबाबत कुणालाच निश्चित सांगता येत नव्हते. अखरे शेखर गोरे यांनी गुरूवारचा मुहूर्त साधत थेट मातोश्री गाठत हातात भगवा घेतला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी शीख समाजात जन्माला आले हीच माझी चूक होती का ?

News Desk

शरद पवार ‘माढा’ मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार ?

News Desk

“संजय राठोड यांचा पुन्हा एकदा मंत्रिमंडळात केलेला समावेश हा अत्यंत दुर्दैवी”, चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया

Aprna