HW News Marathi
राजकारण

लोकसभा निवडणुकीच्या वेळीच विधानसभेचा फॉर्म्युला ठरला !

मुंबई | ‘लोकसभा निवडणुकीच्या वेळीच विधानसभेचा फॉर्म्युला ठरला,’ असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सांगितले. “उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, सन्मानित जागा मिळाल्या तर युती होणार असे स्पष्ट संकेत देखील त्यांनी दिले. येत्या दोन दिवसात युतीचा जागावार कळतील,” असे ते म्हणाले.” शिवसेनेने आज (२० सप्टेंबर) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील मंत्र्यांची बैठक बोलविली होती. निवडणुकीपूर्वीची आढावा बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी सेनाभवनातील पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

यावेळीराम मंदिराचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना, काही लोक चुकीचे वक्तव्य करत आहेत,” असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता शिवसेनेवर टीका केली होती. यावर पत्रकारांनी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारले यावर ते म्हणाले की, “अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतिक्षा करत आहोत.आणि आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचे म्हणाले. पंतप्रधान मोदींनी केलेली टीका ही आमच्यावर केली नसल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगतले.” आरेतील वृक्षतोडला विरोध असल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले. तसेच नाणारला स्थानिकांचा विरोध असल्याचे देखील ठाकरेंनी पत्रकार परिषदेत सांगितले.

उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

  • शेतकरी नेता किशोर तिवारी यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला – उद्धव ठाकरे
  • ५ वर्षात शिवसेनेने सरकारला दगा दिला नाही – उद्धव ठाकरे
  • अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतिक्षा – उद्धव ठाकरे
  • आरे आणि नाणारला स्थानिकांमुळे विरोध – – उद्धव ठाकरे
  • आरे तील वृक्ष तोडीला आमचा विरोध – – उद्धव ठाकरे
  • विकास कामाला आमचा विरोध नाही – उद्धव ठाकरे
  • मुख्यमंत्र्यांची आमची यादी जाहीर करणार – उद्धव ठाकरे
  • येत्या दोन दिवसात युतीचा जागावाटप कळतील – उद्धव ठाकरे
  • लोकसभा निवडणुकीच्या वेळी विधानसभेचा फॉर्म्युला ठरला – उद्धव ठाकरे
  • सन्मानित जागा मिळाल्या तरच युती – उद्धव ठाकरे

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानपरिषदेसाठी काँग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरेंना उमेदवारी

Aprna

भारत जोडो यात्रा नांदेडमध्ये 7 नोव्हेंबरला येणार; अशोक चव्हाणांची माहिती

Aprna

#मीटू : एम. जे. अकबर यांची ९७ वकिलांची फौज

swarit