HW News Marathi
महाराष्ट्र

आम्ही तोंड उघडलं तर अमृता फडणवीसांना तोंड लपवायला जागा राहणार नाही, शिवसेना आक्रमक 

मुंबई | राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंदिर उघडण्यासंबंधी लिहिलेल्या पत्रावरुन राजकीय वातावरण तापले. विरोधी पक्षाकडून कडाडून टीका सुरु झाल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या उत्तरावर विरोधी पक्षातील नेत्यांनी नाराजीही व्यक्त केली आहे. या प्रकरणावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट करत महाराष्ट्रात बार आणि लिकर शॉप्स सगळीकडे सुरु झाली आहेत, मग मंदिरं काय डेंजर झोनमध्ये आहेत का? असा प्रश्न विचारला आहे. त्यांच्या या प्रश्नावरुन शिवसेना महिला आघाडी आक्रमक झाली आहे.

शिवसेनेच्या सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी आम्ही तोंड उघडलं तर अमृता फडणवीसांना तोंड लपवायला जागा राहणार नाही असं म्हटलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी म्हटलं की, “अमृता फडणवीस कोण आहेत? आमदार, खासदार, नगरसेविका की प्रवक्त्या..त्या माजी मुख्यमंत्र्याच्या पत्नी आहेत. त्यांनी त्याच भूमिकेत राहावं. खासदार, आमदार, नगरसेवक, प्रवक्ता असेल तर ऐकून घेऊ. पती मुख्यमंत्री झाल्यावर राजकारणात आलेल्यांनी आम्हाला शिकवू नये”. “आदित्य ठाकरेंसोबत शिवसेना पक्षाची ही चौथी पिढी राजकारणात आहे.आम्हाला काय करायचं हे शिकवू नये आणि आमचं तोंड उघडू नये. आम्हाला निश्चित संस्कृती आहे. आम्ही तोंड उघडलं तर त्यांना तोंड लपवायला जागा राहणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला आहे.

काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस?

“वाह प्रशासन! बार आणि लिकर शॉप्स सुरु झाले आहेत मग मंदिरं काय डेंजर झोनमध्ये आहेत का? अनेकदा असं होतं की बऱ्याच गोष्टींसाठी प्रमाणपत्राचीच गरज लागते”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रस्त्यांची डागडुजी, नालेसफाई, आपत्ती व्यवस्थानातील सर्व मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करावेत! – एकनाथ शिंदे

Aprna

दरेकरांची राष्ट्रवादीवर टीका करताना जीभ घसरली, चंद्रकांत पाटील म्हणतात….

News Desk

माजी मंत्री एकनाथ खडसे दोषी! कायदेतज्ञ असीम सरोदेंचा दावा!

News Desk