HW News Marathi
राजकारण

साताऱ्यातील भाजपचा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर

सातारा। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक दिग्गज नेत्यांनी भाजप-शिवसेनेत प्रवेश केला. साताऱ्यातील राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर भाजपमध्ये गेलेल्या शिवेंद्रराजे भोसलेमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे भाजपेमधील दीपक पवार हे पक्षावर नारज आहेत. कारण मागील दोन वेळा शिवेंद्रराजेंच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढविली होती. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून शिवेंद्रराजे भोसले यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे २२ सप्टेंबरला साताऱ्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी शरद पवार यांच्या उपस्थितीत दीपक पवार राष्ट्रवादीत प्रवेश करतील. ‘शिवेंद्रराजे हटाव’चा नारा देत दीपक पवार राष्ट्रवादीत येणार आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत शिवेंद्रराजे यांच्याविरोधात दीपक पवार यांनी आरपारची लढत दिली होती.

त्यामुळे त्यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीची ताकद वाढणार असल्याचे बोले जाते. तर दुसरीकडे, शिवेंद्रराजे भोसले यांच्या अडचणी वाढणार आहेत. तोंडावर आलेली विधानसभा निवडणूक, राष्ट्रवादीला लागलेली गळती, पक्षाची एकूणच स्थिती लक्षात घेऊन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार स्वतःच मैदानात उतरले आहेत. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ते राज्यभर दौरा करणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कुणी हिंदू मुलीला स्पर्श केला तर त्याचे हात तोडून टाका !

News Desk

माजी आमदार संदीप बजोरिया आयकर खात्याच्या रडारवर

News Desk

देशाचे विभाजन करणाऱ्यांना येथेच गाडू!

News Desk