HW News Marathi
Covid-19

राज्यातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा घटला तर कोरोनामुक्तांचा आकडा दुप्पट

मुंबई । राज्यातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने राज्यासाठी हा एक मोठा दिलासा आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (१२ ऑक्टोबर) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, “गेल्या २४ तासांत राज्यात ७ हजार ८९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर तब्बल १५ हजार ६५६ रुग्ण याच एका दिवसात कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात आज नोंद झालेल्या नव्या कोरोनाबाधितांच्या आकडयाहून दुप्पट आकडा कोरोनामुक्त झालेल्यांचा आहे. तर राज्यात आतापर्यंत एकूण १२ लाख ८१ हजार ८९६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन दवाखान्यातून आपल्या घरी परतले आहेत. तर सद्यस्थितीत राज्यात एकूण २ लाख १२ हजार ४३९ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८३.४९% झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मुंबईत सध्या तरी लॉकडाउन लावण्याइतकी बिकट परिस्थिती नाही पण…”

News Desk

देशात गेल्या २४ तासांत २४,४२९ नवे रुग्ण आढळले

News Desk

HW Exclusive : लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडे विधानपरिषदेवर जाण्यास इच्छुक !

News Desk