HW News Marathi
राजकारण

शरद पवार येत्या १७ सप्टेंबरपासून विधानसभेकरिता राज्यव्यापी दौर्‍यावर

मुंबई | आगामी विधानसभा निवडणुकीला अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार येत्या १७ सप्टेंबरपासून विधानसभा निवडणुकीकरिता राज्यव्यापी दौर्‍यावर असणार आहेत. शरद पवार यांच्या या दौऱ्याची सुरुवात सोलापूर येथून होणार आहे. आता शरद पवार हे स्वतः १७ ते २२ सप्टेंबरपर्यंत पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत.

शरद पवार यांच्या या राज्यव्यापी दौऱ्यात शरद पवार सभांऐवजी पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासोबत बैठका घेणार आहेत. येत्या १७ सप्टेंबरपासून शरद पवार सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, सातारा येथे या बैठका घेणार आहेत. यापूर्वी राष्ट्रवादीने शिवस्वराज्य यात्रा, तसेच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या ‘संवाद यात्रे’च्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान मोदी उद्या सकाळपर्यंत करणार ध्यानधारणा

News Desk

महागाई विरोधात काँग्रेसची १० सप्टेंबर रोजी भारत बंदची हाक

News Desk

शबरीमाला मंदिरात महिलांचा प्रवेश ही विनाशकारी घटना !

News Desk