HW News Marathi
राजकारण

शबरीमाला मंदिरात महिलांचा प्रवेश ही विनाशकारी घटना !

नवी दिल्ली | शबरीमाला येथील आय्यपा मंदिराच्या गाभाऱ्यात अखेर दोन महिलांनी प्रवेश करून दर्शन घेतल्याची घटना विनाशकारी असल्याचे ट्विट भाजपचे माहिती आणि तंत्रज्ञानाचे राष्ट्रीय प्रमुख अमित मालवीय यांनी केले आहे. याआधीही भाजपाच्या केरळमधल्या नेत्यांनी परंपरा मोडण्यास विरोध केला होता. परंतु आज (२ जानेवारी) पहाटे शबरीमाला मंदिरात बिंदू व कनकदुर्गा या पन्नाशीच्या आतल्या महिलांनी पोलिसांच्या बंदोबस्तात प्रवेश केला, आणि शेकडो वर्षांची परंपरा मोडली.

सर्वोच्च न्यायालयाने महिलांना मंदिरात प्रवेश देण्याचा आदेश दिल्यानंतर प्रचंड विरोधाचा सामना मंदिरात जाऊ इच्छिणाऱ्या महिलांना करावा लागला होता. या दोन महिलांसमवेत काही पोलीस गणवेशात होते, तर काही पोलीस कर्मचारी सिव्हील ड्रेसमध्ये त्या महिलांना सुरक्षा पुरवत होते. तसेच मंदिरात प्रवेश करणाऱ्या सर्व इच्छूक महिलांना केरळ सरकारकडून पोलीस सुरक्षा देण्यात येणार असल्याचे केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी म्हटले आहे.

भगवान अयप्पांच्या मंदिरात कोणत्याही वयोगटतील महिलांना कोणताही भेदभाव न कराता प्रवेश द्यावा, असा आदेश २८ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या परवानगीनंर १७ ऑक्टोबरला मंदिराचे दरवाजे उघडण्याचे आदेश दिले होते. या मंदिरात महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची ऐतिहासिक निर्णयामुळे येथील परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘ये दोस्ती आगे भी चलती रहेगी’, तेजस्वी यादव यांच्या भेटीनंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

Aprna

OBC आरक्षणासह निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा! दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करा – सर्वोच्च न्यायालय

Aprna

काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये २ जागांवरून वाद

News Desk