HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

राष्ट्रवादीचे माजी आमदार भास्कर जाधव स्वगृही परतले

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार भास्कर जाधव आज (१३ सप्टेंबर) हाती शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश करणार आहे. शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी भास्कर जाधव यांनी आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्त केला. जवळपास १५ वर्षं शिवसेनेपासून लांबानंतर भास्कर जाधव स्वगृही परतणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती आज मातोश्रीवर दुपारी २ वाजता भास्कर जाधव शिवसेनेत प्रवेश जाहीर प्रवेश केला.

१९८२ मध्ये भास्कर जाधव शिवसैनिक म्हणून पक्षात आले. १९९५ ते २००४ या काळात ते चिपळूणमधून दोन वेळा आमदारपदी निवडून आले. दरम्यानच्या काळात त्यांनी अनेक लहान-मोठी पदेही भूषवली. २००४ मध्ये भास्कर जाधव यांनी शिवसेनेला रामराम ठोकला होता. यानंतर २००४ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात ते अपक्ष उमेदवार उतरले. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर जाधवांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

२००९ मध्ये भास्कर जाधव यांनी शिवसेनेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास कदम यांचा पराभव केला. जाधव यांच्या मातोश्रीवर उद्धव ठाकरेंसोबत बैठकाही झाल्या होत्या. भास्कर जाधव हे आज याबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. जाधव यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते देखील सेनेत प्रवेश करणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बुरे काम का बुरा नतीजा क्यों भाई चाचा हाँ भतीजे !

swarit

पवारांना सांगा आमचे सरकार येणार !

News Desk

शरद पवार यांच्या भेटीनंतर उदयनराजे भोसले राष्ट्रवादीमध्ये राहणार ?

News Desk