HW News Marathi
राजकारण

भास्कर जाधवांचा राजीनामा घेण्यासाठी विधानसभा अध्यक्ष मोटारसायकलवरून दाखल

मुंबई | आगामी विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादीचे अनेक ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आपल्या पक्षाची साथ सोडून भाजप-शिवसेनेत प्रवेश करताना दिसत आहेत. राष्ट्रवादीत सुरु असलेली ही गळती अद्याप कायम आहे. आता याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे गुहागरचे आमदार आणि माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी देखील शुक्रवारी (१३ सप्टेंबर) आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. विशेष म्हणजे भास्कर जाधव यांचा राजीनामा घेण्यासाठी हरिभाऊ बागडे हे चक्क मोटारसायकलवरून दाखल झाले.

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी भास्कर जाधव यांचा आमदारकीचा राजीनामा तात्काळ मंजूर केला. आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आज दुपारी भास्कर जाधव शिवसेनेत प्रवेश करतील. दुपारी २ वाजता मुंबई येथे मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित भास्कर जाधव यांचा शिवसेना प्रवेश होईल. दरम्यान, जाधव यांना आपला राजीनामा सचिवांकडे देऊन हरीभाऊ बागडे यांना फॅक्सने पाठवून त्यांची स्वाक्षरी घेता आली असती. मात्र, त्यात खूप वेळ जाईल म्हणून स्वत: उद्धव ठाकरेंनी आपल्यासाठी खास विमानाची व्यवस्था केल्याची माहिती भास्कर जाधव यांनी यावेळी दिली.

आगामी विधानसभेच्या तोंडावर सध्या राष्ट्रवादीला अनेक धक्के पचवावे लागत आहेत. एकीकडे साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले येत्या १४ सप्टेंबरला दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. भास्कर जाधव हे शुक्रवारी (१३ सप्टेंबर) शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. तर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर देखील शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवनीत राणा-भाजपमधील संघर्ष चिघळणार ?

News Desk

आमची ५ वर्षे विरोधकांची रखडलेली काम करण्यातच गेली !

News Desk

कसब्यातील विजयानंतर रवींद्र धंगेकरांनी घेतली शरद पवारांची भेट

Aprna