HW News Marathi
महाराष्ट्र

उदयनराजेंविरुद्ध केलेल्या वक्तव्यानंतर संभाजी भिडे आता प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात आंदोलन करणार का?

मुंबई | वंचित बहूजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती घराण्याच्या वंशजांसदर्भात केलेले वक्तव्य हे त्यांच्या समर्थकांना आणि महाराष्ट्राला पटणारे नाही. परंतु, माझ्याकडून अशाप्रकारचं विधान झालं होतं तेव्हा संभाजी भिडे यांनी आंदोलनाची हाक दिली होती. मग तेच संभाजी भिडे आता प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात आंदोलन करणार का, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

संजय राऊत यांनी आज (९ ऑक्टोबर) मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी संभाजी भिडे यांना चिमटा काढला आहे. यापूर्वी मी छत्रपती घराण्यासंदर्भात विधानं केले होते तेव्हा संभाजी भिडे यांनी आंदोलन छेडले होते. त्यामुळे आता मी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे. आताही ते सातारा, सांगली आणि कोल्हापूर बंद करणार का, हे मी त्यांना विचारेन. म्हणजे आम्हालाही भूमिका घेता येईल, अशी खोचक टिप्पणी संजय राऊत यांनी केली. त्यामुळे आता संभाजी भिडे या टीकेला प्रत्युत्तर देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रान डुक्कराचा घरात घुसून महिलेवर हल्ला

News Desk

चाळीसगाव-धुळे मेमू रेल्वे सेवेला सुरुवात

News Desk

भगवा सगळ्या विचारांचा, राजकारण विकासाच्या मुद्द्यावरच करणार, रोहित पवारांचे वक्तव्य

News Desk