HW News Marathi
मनोरंजन

गणपती विसर्जनसाठी राज्यात २ लाख तर मुंबईत ५० हजार पोलीस तैनात

मुंबई | दहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला आज (१२ सप्टेंबर) सुरुवात झाली आहे. मुंबईतील बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस सज्ज झाले असून बाप्पाचे विर्सजन सुरळीतपणे पार पडावे, यासाठी राज्यभरात दोन लाखांहून अधिक तर राज्याची राजधानी मुंबईत ५० हजारांहून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मुंबईतील चौपाट्या, विसर्जन मिरवणुकीवर ड्रोनद्वारे लक्ष ठेवले जाईल.

राज्यातील बाप्पाचे विर्सजन सुरळीतपणे पार पडावे, यासाठी राज्यभरात दोन लाखांहून अधिक तर राज्याची राजधानी मुंबईत ५० हजारांहून अधिक पोलिसांचा फौजफाटा नेमण्यात आला आहे. मुंबईतील सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेता स्थानिक पोलिसांसोबत सशस्त्र दल, सीआरपीएफ, दंगल नियंत्रण पथक, मुंबई वाहतूक विभाग यांचा फौजफाटा रस्त्यावर हजर असेल. याबरोबरच होमगार्ड, आरएसपी, एनएसएस, एनसीसी स्काऊट गाईड आणि विविध एनजीओची मदत घेतली आहे. गर्दीच्या ठिकाणी महिलांची छेडछाड रोखण्यासाठी व लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गर्दीत साध्या वेशातील पोलीस गस्तीवर असणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने ५००० हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या सहाय्याने लक्ष ठेवले जाणार आहे तर गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, आणि पवई तलाव येथे ड्रोनच्या सहाय्याने निरीक्षण केले जाणार आहे.

रस्ते वाहतूक मार्गातील बदल

महानगरातील विसर्जन मिरवणुकीमुळे शहर व उपनगरातील वाहतूक मार्गात तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात आला आहे. ५६ ठिकाणे वाहनांसाठी बंद असतील, तसेच ५३ जागी दुहेरी मार्ग बंद करून एकेरी बनविण्यात आले आहेत. याशिवाय १८ ठिकाणी अवजड वाहनांना बंदी आणि ९९ ठिकाणी नो पार्किंग क्षेत्र घोषित करण्यात आले आहेत. याबाबत वाहतूक नियंत्रण शाखेकडून विशेष बंदोबस्त करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काळवीट शिकार प्रकरणी १७ जुलैला होणार पुढील सुनावणी

News Desk

२५ जानेवारीला ‘फक्त’ ठाकरे सिनेमाच झळकणार

News Desk

किंग खानच्या ‘झीरो’ सिनेमाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील

News Desk