HW News Marathi
देश / विदेश

पैसा व सत्तेने सर्व काही मिळविता येत नाही

नवी दिल्ली | भाजपचे सरकार बहुमत सिद्ध करु न शकल्यामुळे बी. एस येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेस-एडीएस यांचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. भाजपचे सरकार पडल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

लोकशाहीला विकत घेतले जाऊ शकत नाही, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना कर्नाटकच्या जनतेने दाखवून दिल्याचा मला गर्व आहे”, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी भाजपावर हल्ला केला भ्रष्टाचाराविरोधात बोलणारे पंतप्रधान मोदीच भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देत आहेत.

भाजप, पंतप्रधान, अमित शाह यांनी काँग्रेस-जेडीएसच्या आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, देशात पैसा आणि सत्ता असेल तर सर्व काही मिळते, असे नाही. हे कर्नाटकाच्या जनतेने भाजप सरकारला दाखवून दिले आहे. यावरुन भाजपा आणि आरएसएसने धडा घेतला असेल, अशी अपेक्षा आहे. असेही राहुल गांधी यांनी म्हटले.

  • भाजपने राष्ट्रगीतचा अपमान

देशाच्या जनतेने पाहिले की कर्नाटक विधानसभेमध्ये राष्ट्रगीताआधीच भाजपा आमदार आणि हंगामी अध्यक्षांनी सभागृह सोडले. देशाच्या कोणत्याही संस्थेचा आदर करायचा नाही, हाच त्यांचा स्वभाव आहे, असे राहुल गांधी म्हटले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसैनिकांवर कारवाई करा, महाराष्ट्रातील शिवसेनेची हुकूमशाही थांबवा, नवनीत राणांची पत्रातून मागणी

News Desk

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा आणि त्यांच्या मुलीला कोरोनाची लागण

News Desk

आज ज्योतिरादित्य शिंदे भाजपमध्ये करणार प्रवेश

swarit