नवी दिल्ली | रमजान ईदच्या वेळी काश्मीरमध्ये आतिरेक्यांविरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येणार नसल्याचा निर्णय केंद्र सरकारकने जाहिर केला आहे. सामान्य लोकांनी रमजानच्या काळात कोणतीही कारवाई जम्मू कश्मीर मध्ये करण्यात येऊ नये अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. लोकांनी केलेल्या मागणीनुसार जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्राकडे ही मागणी केली असता केंद्रातून या मागणीला बुधवारी मान्यता मिळाली आहे.
दहशतवाद्याविरोधात रमजानच्या महिन्यामध्ये कोणतेही ऑपरेशन लॉन्च न करण्याचे आदेश केंद्र सरकारने सुरक्षा दलाला दिले आहेत. परंतु दहशतवाद्यांकडून हल्ले झाले तर निर्दोष लोकांचा जीव वाचविण्यासाठी प्रतिहल्ला करण्याची सुट मात्र भारतीय जवानांना देण्यात आली आहे.
Centre asks security forces not to launch operations in J&K during the month of Ramzan. Security forces to reserve the right to retaliate if attacked or if essential to protect the lives of innocent people: Ministry of Home Affairs pic.twitter.com/DgnQO9kQTm
— ANI (@ANI) May 16, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.