HW News Marathi
देश / विदेश

शशिकला यांना व्हीआयपी ट्रिटमेंट, प्रकरण उजेडात आणणा-या अधिका-याचीच बदली

बेंगळूरू: एआयएमडीकेच्या नेत्या व्ही. के . शशिकला यांना कैदेत असताना व्हीआयपी ट्रिटमेंट दिली जात असल्याचा अहवाल सादर करणा-या वरिष्ठ पोलीस अधिकारी डी. रुपा यांची कर्नाटक सरकारने बदली केली आहे, यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

डी. रुपा यांनी काही दिवसांपूर्वी जेलची पाहणी करून सरकारला अहवाल सादर केला होता. त्यामुळे शशिकला यांना जेलमध्ये व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याचे म्हटले होते. शशिकलासाठी जेलमध्ये विशेष किचन तयार करण्यात आले असून त्यासाठी वरिष्ठ जेल अधिकाºयांना सुमारे दोन कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप डी. रुपा यांनी केला होता. दरम्यान, या वृत्तामुळे बेंगळुरू सरकारचा कारभार चव्हाट्यावर आला होता. त्यांच्यावर सर्वत्र टीका होत असताना सरकारने डी. रुपा यांचीच बदली करण्याचा निर्णय घेतला आहे. रुपा यांनी सरकारी सेवा शर्तीचा भंग केल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत, याकडे जय, पराजयच्या दृष्टीने बघू नये !

News Desk

अहमदाबादमध्ये इमारत कोसळली

Gauri Tilekar

सोनियांचं पत्र म्हणजे दबावतंत्र नाही | संजय राऊत

News Desk