HW News Marathi
देश / विदेश

पवारांना शिवसेना संपवायची आहे !, बड्या भाजप नेत्याचा धक्कादायक दावा  

मुंबई | भाजपच्या एका मोठ्या नेत्याने केलेल्या धक्कादायक दाव्यामुळे आता राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ उडण्याची शक्यता आहे. “शरद पवारांना शिवसेना संपवायची आहे”, असा धक्कादायक दावा माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डीले यांनी केला आहे. “शरद पवार सांगतात की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कॅप्टन आहेत. मात्र त्यांना बाहेर फिरुच दिले जात नाही. तर दुसरीकडे शरद पवार स्वतः मात्र या वयातही सर्वत्र फिरत आहेत. त्यामुळे शिवसेना संपवणे हाच त्यामागचा एकमेव हेतू आहे”, असे शिवाजी कर्डीले म्हणाले.

शिवाजी कर्डीले यांनी यावेळी राज्यातील महाविकासआघाडी सरकार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “शिवसेना संपवणे हा शरद पवारांचा हेतू असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. त्याचप्रमाणे, असे करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसला कशा पद्धतीने ताकद मिळवून देता येईल याचा देखील पवारांकडून प्रयत्न सुरु आहे”, असाही दावा शिवाजी कर्डीले यांनी यावेळी केला आहे. दरम्यान, शिवाजी कर्डीले यांच्या या दाव्याने निश्चितच पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडण्याची शक्यता आहे.

“राज्यातील महाविकासआघाडी सरकार अपयशी ठरल्याचे मी नव्हे तर सर्वसामान्य जनता म्हणत आहे. हे सरकार कोरोनाला रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. राज्यात अनेक ठिकाणी समस्या आहेत. रुग्णांसाठी बेड उपलब्ध न होणे, ऑक्सिजन त्याचप्रमाणे औषधे उपलब्ध न होणे, अशा अनेक समस्यांना लोकांना सामोरे जावे लागत आहे. तर दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये मात्र लाखो रुपयांची बिलं भरावी लागत आहेत. त्यामुळे हे स्पष्ट आहे कि हे सरकार कोरोनास्थिती हाताळण्यात अपयशी ठरलं”, अशीही टीका शिवाजी कर्डीले यांनी यावेळी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Lockdown : नियमांचे उल्लंघन केल्याने लोकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण होत आहे

News Desk

भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये चकमक, १ अधिकारी आणि २ जवान शहीद

News Desk

टिपू सुल्तान जयंतीवरुन बेळगावात दोन गट भिडले, जमावाच्या दगडफेकीत पोलीस आयुक्त जखमी

News Desk