HW News Marathi
Covid-19

मुंबई-पुण्यासह राज्यातील अन्य रेड झोनमध्ये दारू विक्रीला परवानगी

मुंबई | महाराष्ट्र सरकारने आता मुंबई आणि पुण्याती रेड झोनमधील कंटेनमेंट झोन वगळून इतर परिसरातली दारूची दुकाने उघडण्याची परवनागी दिली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव भूषण गगरानी यांनी दिली आहे. राज्यात उद्यापासून (४ मे) दारु विक्रीला परवानगी मिळाली असून एका लेनमधील केवळ पाचच दुकाने सुरू राहू शकतात. मद्यविक्री करणारी दुकाने सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला असला तरी अद्याप स्पा, सलून, पार्लर याबद्दल कोणताही निर्णय झालेला नाही.अत्यावश्यक सेवेत न येणारी एका रस्त्यावरची ५ दुकाने सुरू ठेवता येणार आहे.

केंद्राच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे गगरानी म्हटले. दुकाने सुरू करताना मास्कसह फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. दुकानांमध्ये गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश देखील दिले आहे. एकाचवेळी सर्व दुकाने उघडू नयेत, यासाठी नियमावली तयार करण्याचे अधिकार पालिकांना देणार आहे. त्यामुळे एकावेळी किती दुकाने उघडी ठेवायची, ती किती वेळ सुरू ठेवायची, याचे निर्णय घेण्याचा अधिकार पालिका प्रशासनाला असे, असेही त्यांनी सांगितले.

रेड झोन (१४) मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, पालघर, नाशिक, नागपूर, सोलापूर, यवतमाळ, औरंगाबाद, सातारा, धुळे, अकोला, जळगाव

ऑरेंज झोन (१६) – रायगड, अहमदनगर, अमरावती, बुलडाणा, नंदुरबार, कोल्हापूर, हिंगोली, रत्नागिरी, जालना, नांदेड, चंद्रपूर, परभणी, सांगली, लातूर, भंडारा, बीड

ग्रीन झोन (६) – उस्मानाबाद, वाशिम, सिंधुदुर्ग, गोंदिया, गडचिरोली, वर्धा

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांनी ‘येडं पेरलं अन् खुळं उगवलं’ अशी ठाकरे सरकारची गत !

News Desk

शरद पवार आज दिवसभर अन्नत्याग करणार !

News Desk

मुंबईसाठी दिलासादायक बातमी ! नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा अधिक

News Desk