HW News Marathi
Covid-19

माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकरांची कोरोनावर यशस्वी मात !

लातूर | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी वयाच्या ९१व्या वर्षी कोरोनावर मात केली आहे. शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचा १६ जुलैला कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. आणि आता सुखरुप त्यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून लातूरच्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.

कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याने त्यांची चाचणी करण्यात आली होती आणि त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. यानंतर १७ दिवसांनी त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी सुटकेचा निश्वा:स सोडला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात गेल्या २४ तासात १९,१४८ नव्या रुग्णांची भर

News Desk

आता तरी जागे व्हा ! फडणवीसांचा आघाडी सरकारला सल्ला 

News Desk

राज्यात कोरोनाधितांचा आकडा ५२१८ तर पुण्यात आत्तापर्यंत ८७ कोरोमामुक्त

News Desk