HW News Marathi
व्हिडीओ

Rohit Pawar And Sharad Pawar | साहेबांच राजकारण म्हणजे कुणीही उठावं आणि बोट दाखवाव असं नाही!

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसला जोरदार गळती लागली आहे. पक्षात राहून आमदार, खासदार मंत्रीपद मिळवलेले नेते पवारांची साथ सोडत आहेत. याच दलबदलू नेत्यांवर रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे. भरडं पीठ पण दूसऱ्या पक्षात गेलं, आत्ता जमिनच नांगरायची वेळ आलेय, असं रोहित यांनी म्हंटले आहे. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी भाजप नेत्यांवर देखील टीका केली आहे.गरज पडली की साहेबांचा सल्ला, गरज पडली की बारामतीत येवून साहेबांच कौतुक करायचं आणि निवडणुकीची वेळ आली की त्यांनीच विचारायचं साहेबांनी काय केलं? डबल ढोल असतो. जो दोन्हीकडून वाजतो. समोरच्या पक्षाचं राजकारण नेहमीच डबल ढोल असल्यासारखं वाजत असत. पण आत्ता बास झालं. साहेबांच राजकारण म्हणजे कुणीही उठावं आणि बोट दाखवाव अस निश्चितच नाही. अशी टीका रोहित यांनी केली आहे.#RohitPawar #SharadPawar #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Yeola उत्तर-पूर्व भागात पाणीटंचाई; पंचायत समितीकडे टँकरची मागणी

News Desk

Andheri पोटनिवडणुकीसंदर्भात राज ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना पत्र

Seema Adhe

Congress चे 10 आमदार बहुमत चाचणीला का हजर नव्हते?, Yashomati Thakur म्हणाल्या…

News Desk