HW News Marathi
महाराष्ट्र

खुशखबर! एसटी कर्मचाऱ्यांचे रखडलेले पगार लवकरच मिळणार

मुंबई | राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे लॉकडाऊन जारी करण्यात आला. या लॉकडाउनमुळे गेल्या ५ महिन्यांपासून ठप्प झालेली राज्याची लालपरी अर्थात एसटी बस वेगाने धावू लागली आहे. मात्र, पगार थकल्यामुळे एसटी कर्मचारी हवालदील झाले आहे. अखेर परिवहन मंत्री अनिल परब यांनी याबद्दल ट्वीट करून एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे.

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना एका महिन्याचा पगार येत्या गुरूवारी मिळणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी ट्विटरवरून दिली आहे.’एसटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पगाराबाबत मी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीत कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याचे त्यांनी मान्य केले. कर्मचाऱ्यांचा एका महिन्याचा पगार येत्या गुरुवारपर्यंत त्यांच्या खात्यात जमा होईल.’ असे परब यांनी सांगितले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पवार परिवाराशी संबंधित पारनेर कारखाना घोटाळाप्रकरणी लवकरच कारवाई सुरू होणार – सोमय्या

News Desk

नाथाभाऊंच्या प्रदीर्घ अनुभवाचा आम्हाला फायदा होईल – धनंजय मुंडे

News Desk

“खासगी कामासाठी सरकारी विमानाने प्रवास का केला?”, हायकोर्टाचा राऊतांना सवाल

News Desk