HW News Marathi
महाराष्ट्र

खासगी कंपनीच्या माध्यमातून सदाभाऊ इस्त्राईलच्या दौऱ्यावर

सातारा | साताऱ्याचे सह पालकमंत्री सदाभाऊ खोत इस्त्राईलच्या दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यात त्यांच्यासमवेत देशातील 180 शेतकऱ्यांचा समावेश आहे. एका खासगी कंपनीच्या माध्यमातून सदाभाऊ या दौऱ्यात सहभागी झाले आहेत. खासगी कंपनीच्या माध्यमातून होणारा हा दौरा मात्र, सशुल्क असल्याचे सांगितले जात आहे.

इस्त्राईल देशाने कमी पाणी असूनही शेतीमध्ये अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चांगली प्रगती साधली आहे. याचा अभ्यास करण्यासाठी जगभरातील शेतकरी इस्त्राईलला जातात. आता काही खासगी कंपन्याही शेतकऱ्यांसाठी इस्त्राईलचा दौरा आयोजित करतात.

त्यासाठी त्यांची जाहिरात विविध माध्यमातून होऊन त्यातून जे शेतकरी सशुल्क जाण्यास तयार आहेत. त्यांचाच या दौऱ्यात समावेश होतो. या दौऱ्यात कृषी व पणन राज्यमंत्री व साताऱ्याचे सहपालकमंत्री सदाभाऊ खोत हेही सहभागी झाले आहेत. बुधवारी ते मुंबईतून इस्त्राईलकडे विमानाने रवाना झाले असून सात मे रोजी ते मायदेशी परतणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘पूरग्रस्तांना पॅकेज म्हणजे वृत्तपत्रातील प्रसिद्धीची बातमी’, आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला टोला

News Desk

ईडी कार्यालयात चौकशीला का जाणार नाही याचे खडसेंकडून स्पष्टीकरण!

News Desk

महाज्योतीकडून विद्यार्थ्यांना टॅबचं वितरण – विजय वडेट्टीवार

News Desk