HW News Marathi
महाराष्ट्र

चिंताजनक ! मुंबई – पुण्यात आज सर्वाधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई । राज्यातील कोरोनाचा कहर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. विशेषतः मुंबई, पुणे या दोन्ही प्रमुख शहरांची कोरोनास्थितीही आता चिंताजनक होत चालली आहे. एकट्या मुंबईत आज (३ एप्रिल) दिवसभरात तब्बल 9 हजार 90 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. धक्कादायक म्हणजे शहरातील गेल्या वर्षभरातील ही कोरोनाबाधितांची सर्वाधिक मोठी नोंद आहे. तर मुंबईत याच दिवसभरात 5 हजार 322 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मुंबईतील कोरोनामुक्त होणाऱ्यांचा दर आता 83 टक्के झाला आहे. सद्यस्थितीत मुंबईत 62 हजार 187 ऍक्टिव्ह रुग्ण असून मुंबईचा कोरोना रुग्ण दुप्पटीचा दर 44 दिवसांवर येऊन पोहोचला आहे.

मुंबईप्रमाणेच आज पुण्यातही आतापर्यंतची सर्वाधिक कोरोना रुग्णवाढ झाली आहे. पुण्यात आज दिवसभरात तब्बल 5 हजार 720 नवे कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर शहरात याच एका दिवसात 3 हजार 293 जण कोरोनामुक्त झाले आहेत. चिंताजनक म्हणजे पुण्यात गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 44 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 9 रूग्ण पुण्याबाहेरील आहेत. तर सद्यस्थितीत पुण्यातील 39 हजार 518 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. त्यामुळे, एकंदरीतच मुंबई आणि पुणे दोन्ही ठिकाणची स्थिती काळजी वाढवणारी आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं का?”, अजित पवार म्हणतात..

News Desk

मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये जशी फूट पडली तशी महाराष्ट्रात मोठी फूट पाहायला मिळेल – सदाभाऊ खोत

News Desk

पन्हाळगडावरून शिवज्योत घेऊन जाणा-या विद्यार्थ्यांच्या ट्रकला धडक, पाच जण ठार तप २५ जण जखमी

swarit