HW News Marathi
व्हिडीओ

Vanchit Bahujan Aaghadi | राज्याचं विरोधी पक्षनेतेपद वंचितकडे ..!

शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आता केवळ काही जिल्ह्यांपुरता मर्यादीत राहिला आहे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. तसेच भविष्यात वंचित बहुजन आघाडी विरोधी पक्षात असेल, असं भाकीतही मुख्यमंत्र्यांनी वर्तवलं. वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत आपली ताकद दाखवून दिली आहे. विधानसभा निवडणुकीतही आघाडीसोबत युती न करता वंचित स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे. सुरुवातीपासून वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. वंचितच्या भवितव्याविषयी बोलताना मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, “सध्याची परिस्थिती पाहिली तर ही बी टीम आता ए टीम बनली आहे. आगामी काळात राज्याचं विरोधी पक्षनेते पद हे वंचित आघाडीकडे असेल.” #PrakashAambedkar #VBA #SharadPawar #DevendraFadnavis

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“टी-शर्टवर बोलण्यापेक्षा महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नांवर बोला”- Nana Patole

News Desk

मलबार हिल” नव्हे “रामनगरी”!- दिलीप लांडे

News Desk

मुंबईमध्ये शिवसेना- भाजपमध्ये हाणामारी ! शिवसेना भवनासमोरचं राडा…

News Desk