HW News Marathi
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनिकेत तटकरेंना उमेदवारी

मुंबई : विधान परिषदेसाठी येत्या २१ मे रोजी निवडणूका होत आहेत. या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कोकणतल्या मतदारसंघातून विधान परिषदेसाठी माजी मंत्री सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. अनिकेत गुरुवारी सकाळी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर शिवसेनेकडून राजीव साबळे यांना उमेदवारी देण्यात आली असून साबळेंनी बुधवारी रत्नागिरीत आपला अर्ज दाखल केला आहे.

परंतु कोकण विधान परिषद निवडणूक योवेळी भाजप लढवणार नसून भाजपकडून ही जागा नारायन राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षासाठी देण्यात येणार आहे. राणेंनी मात्र अद्याप या ठिकाणी आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. नारायण राणेंचा स्वाभिमान पक्ष ही निवडणूक लढणार नसल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. त्याचबरोबर विधान परिषदेच्या सहा जागांसाठी शिवसेना-भाजप यांच्यात युती होण्याची शक्यता आहे.

भाजपसह स्वाभिमान पक्षाने शिवसेनेच्या साबळेंना पाठिंबा दिला तर अनिकेत तटकरे यांना ही निवडणूक जड जाण्याची शक्यता नाकारात येत नाही. या आधी तटकरेंच्या घराणेशाहीला कंटाळून साबळे राष्ट्रवादीमधून सेनेत आले होते. या निवडणूकीच्या निमित्ताने तटकरेंच्या विरोधात साबळे असणार आहेत त्यामुळे ही निवडणुक राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेची समजली जात आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुन्हा एकदा शेतकऱ्यांना लेखी आश्वसनाचे गाजर ?

News Desk

“काही तरी असल्याशिवाय कोणी व्यक्ती नॉट रिचेबल नसतो”, शुभांगी पाटील यांचे सूचक विधान

Aprna

अण्णा हजारेंची प्रकृती बिघडली, यकृतावर परिणाम

News Desk