HW News Marathi
देश / विदेश

महाराष्ट्राची महिला व बालविकास क्षेत्रातील कामगिरी अफगाणिस्तानसाठी मार्गदर्शक ठरेल !

मुंबई | “भारत तसेच महाराष्ट्राशी अफगाणिस्तानचे ऐतिहासिक संबंध आहेत. महिला व बालविकासाच्या क्षेत्रातील महाराष्ट्राच्या चांगल्या कामगिरीच्या संकल्पना, कौशल्य अफगाणिस्तानला पुरविण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करू”, असे आश्वासन महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले आहे. परस्पर सहकार्याच्या अनुषंगाने मंत्री ॲड. ठाकूर यांची अफगाणिस्तानच्या महावाणिज्यदूत श्रीमती झकिया वार्दक यांनी भेट घेतली.

महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास विभागाची अफगाणिस्तानमधील महिला मंत्रालयासोबत ऑनलाईन बैठक व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करुन झकिया वार्दक म्हणाल्या कि, “राज्यामध्ये महिला व बाल सक्षमीकरणाचे कार्यक्रम कशा पद्‌धतीने राबविले जात आहेत याची माहिती अफगाणिस्तानच्या मंत्रालयाला याद्वारे मिळू शकेल.”

मंत्री यशोमती ठाकूर यावेळी म्हणाल्या, “अफगाणिस्तानशी असलेले सौहार्दाचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र शासन उत्सुक आहे. महाराष्ट्रातील महिला व बाल सक्षमीकरणाच्या कार्यक्रमांची माहिती अफगाणिस्तानला या क्षेत्रातील धोरणे बनविताना निश्चितच उपयुक्त ठरतील. महिला सक्षमीकरणासाठी विचारांचे आदान-प्रदान आवश्यक असून त्यासाठी लवकरच ऑनलाईन बैठक करण्यात यावी.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केरळमध्ये एअर इंडियाचं विमान रन वेवरुन काल घसरले, १८ जणांचा मृत्यू तर विमानाचे झाले २ तुकडे 

News Desk

शरद पवारांचे केरळमध्ये काँग्रेसला ‘खिंडार’, केरळची महिला नेता राष्ट्रवादीत करणार प्रवेश

News Desk

अमित शहांना गृहमंत्री पदावरून हटवा, राष्ट्रपतींकडे सोनिया गांधींची मागणी

swarit