HW News Marathi
राजकारण

काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंविरोधात वॉरंट

सोलापूर । सोलापूरमधील काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना जिल्हा न्यायालयातर्फे जामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले आहे. विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीदरम्यान देशमुख यांना घेराव घालण्याचा प्रयत्न करताना झालेल्या धक्काबुक्कीत एक पोलीस जखमी झाल्याने या प्रकरणी न्यायालयात खटला दाखल करण्यात आला.

जिल्हा नियोजन समितीच्या २ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या बैठकीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केले होते. बैठक सुरु असताना एकीकडे आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शासकीय रुग्णालयातील प्रश्नांसाठी आंदोलन करण्यात आले. याचवेळी बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या पोलिसांनी हे आंदोलन रोखण्याचा प्रयत्न केला असता काँग्रेस कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की करत हुज्जत घातली होती. यामध्ये पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह नऊ जणांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणी सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयात पोलिसांनी दोषारोप पत्रसुद्धा दाखल केले होते. वेळोवेळी सुनावणीची तारीख देऊनही सतत गैरहजर राहिल्याने प्रणिती शिंदे आणि नगरसेवक चेतन नरोटे यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट काढले आहे. दरम्यान, आमदार प्रणिती शिंदे यांच्यासोबत माजी आमदार प्रकाश यलगुलवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले आणि अन्य सहा जणांनी न्यायालयात सांगितलेल्या तारखेला हजेरी लावली होती. त्यांना न्यायालयातर्फे २९ऑगस्टपर्यंत अंतरिम जामीन देण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने राज्याचा विकास साधणार! – मुख्यमंत्री

Aprna

जगभरातील उद्योजकांचा महाराष्ट्रावर विश्वास, गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे ‘फेव्हरेट डेस्ट‍िनेशन’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ‘हा’ निर्णय घेतल्यामुळे गोपीचंद पडळकरांनी मानले आभार

Aprna