नाशिक | “सगळीच रसायने चांगली नसतात,” असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिक मेळाव्यात त्या बोलताना म्हणाल्या होत्या. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला गळती सुरुच असून पक्षातील नेते भाजप-शिवसेनेत प्रवेश करत आहेत. यावेळी भाजपकडे वॉशिंग पावडर आहे. यामुळे यांच्याकडे गेले की नेते स्वच्छ होतात, अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली होती. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वॉशिंग पावडर नाही तर डॅशिंग केमिकल आहे, असे सडेतोड दिले. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री आणि सुप्रिया सुळे यांच्यात शाब्दिक चकमक सुरू आहे.
याविषयी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “मी परवा मुख्यमंत्र्यांना विचारले, तुम्ही आमच्यावर आरोप करता, पण तोच माणूस तुमच्याकडे आला तर साफसुथरा आणि चांगला होतो. अशी कसली वॉशिंग पावडर तुमच्याकडे आहे की, धुवून माणूस साफ होतो. त्याचे उत्तर त्यांनी काल (२६ ऑगस्ट) दिल, ते म्हणाले सुप्रिया सुळे, आमच्याकडे वॉशिंग पावडर नाही, आमच्याकडे डॅशिंग रसायन आहे.
“मी सायन्स स्टुंडट आहे. सगळीच रसायने चांगली नसतात. आजकाल शेतकरी पण रसायने नको, कीटकनाशके नको म्हणतात. महिला रसायने असलेल्या भाज्या नको म्हणतात.” त्यामुळे तुम्हाला यांच्या रसायनाचा विकास हवाय की आम्ही केलेला विकास पाहिजे, याचा विचार करायची वेळ आली आहे. बीड येथील पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रिया सुळे यांच्या संवाद दौऱ्यावर टीका केली आहे. सुप्रिया सुळे यांनी सत्ता असताना जनतेशी संवाद साधला असता, तर ही वेळ आली नसती, असा टोला सुळे यांच्या संवाद दौऱ्यदरम्यान लगावला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.