HW News Marathi
देश / विदेश

काश्मीर हा द्विपक्षीय मुद्दा, कोणीही हस्तक्षेप करू नये !

नवी दिल्ली | “काश्मीर मुद्दा हा द्विपक्षीय मुद्दा आहे. अन्य कोणत्याही देशात या हस्तक्षेप करू नये. आम्ही एकत्र येऊन चर्चेच्या माध्यमातून हा मुद्दा सोडवू”,असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापुढे जम्मू काश्मीरच्या मुद्द्याप्रकरणी भारताची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. फ्रान्समधील जी 7 परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली. यावेळी यांच्यात काश्मीर मुद्यावर चर्चा झाली.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत झालेल्या भेटीदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नाबाबत चर्चा केली होती. त्याचप्रमाणे, डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील आपण काश्मीरप्रश्न सोडविण्याकरिता भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करण्यास तयार असल्याचे म्हटले होते. त्यावेळी देखील भारताने काश्मीर मुद्दा हा द्विपक्षीय मुद्दा असल्याचे म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली होती.

आता पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची प्रत्यक्ष भेट झाल्यानंतरही पंतप्रधान मोदी यांनी भारताच्या या भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे. याच पार्श्वभूमीवर “काश्मीर मुद्द्यासाठी आम्ही अन्य कोणत्याही देशाला त्रास देणार नाही. काश्मीर राज्याचा मुद्दा हा द्विपक्षीय मुद्दा आहे. याबाबतीत अन्य कोणत्याही देशाने यात हस्तक्षेप करू नये”, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी काश्मीर प्रश्नी सूचक विधान केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अण्णा हजारे यांचे उपोषण मागे

News Desk

दीदी ओ दीदी… शरद पवार आणि संजय राऊतांकडून माता बॅनर्जींचं अभिनंदन!

News Desk

तब्बल 150 वर्ष ‘इथे’ होळी साजरी झालीच नाही; धक्कादायक कारण आलं समोर

Manasi Devkar