HW News Marathi
महाराष्ट्र

‘ही’ शिवसेनेची मजबुरी आहे काय ?, प्रवीण दरेकरांचा सवाल 

मुंबई | “गेली २५ ते ३० वर्षे शिवसेना भाजपसोबत युती करून राजकारण करत होती. मग ती शिवसेनेची मजबुरी होती काय ?”, अशी बोचरी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. “शिवसेना मजबुरी म्हणून भाजपसोबत होती ? कि शिवसेना हिंदुत्व व राष्ट्रवादाच्या मुद्द्यासाठी भाजपासोबत होती ? याचे उत्तर संजय राऊतांनी द्यावे”, असे म्हणतानाच शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत स्थापन केलेल्या महाविकासआघाडीवर सरकारवरून देखील प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

प्रवीण दरेकरांनी पुढे शिवसेनेला कोंडीत पकडताना असा प्रश्न विचारला कि, “भाजप-शिवसेनेसोबतची युती ही शिवसेनेची मजबुरी होती कि युतीमध्ये लढून नैसर्गिक युती भाजपसोबत असतानाच ते बाजूला ठेवून राष्ट्रवादी व कॉंग्रेससोबत महाविकास आघाडीचे सरकार बनविणे ही शिवसनेची मजबुरी आहे का ? याचेही उत्तर संजय राऊत यांनी द्यावे. आपल्या सोयीप्रमाणे बोलणे हे जनतेला पसंत पडत नाही हे संजय राऊत यांच्या अलिकडच्या काळातील वक्तव्यावरून दिसून येते”, अशीही टीका यावेळी प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेसह संजय राऊतांना लक्ष्य करत केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘‘त्या’ सूचने बदल, नितेश राणेंनी दिल्लीत जाऊन माहिती घ्यावी’, विनायक राऊतांचा नितेश राणेंना सल्ला

News Desk

खुशखबर! पश्चिम रेल्वेकडून आता लोकलच्या फेऱ्या ५०० पर्यंत वाढवणार

News Desk

कम बॅक राहुलजी, बाळासाहेब थोरात यांनी लिहिले राहुल गांधींना पत्र

News Desk