HW News Marathi
महाराष्ट्र

माझ्या विरोधात ईडी, सीबीआयची नोटीस काढून दाखवा !

मुंबई | “सरकार सध्या विरोधकांविरोधात सूडबुद्धीने कारवाई करत आहे. माझ्या विरोधात ईडी किंवा सीबीआयची नोटीस काढून दाखवा” असे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट सरकारलाच खुले आव्हान दिले आहे. सोलापूरच्या संवाद दौऱ्यावर सुप्रिया सुळे बोलत होत्या. कोहिनूर मिल ३ प्रकरणी नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीकडून चौकशी झाली तर आयएनएक्स मीडियातील कथित घोटाळ्याप्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांकडून सरकार जोरदार टीका होत आहे.

“हे सरकारचे दबावतंत्र असून सरकारकडून सूडबुद्धीने ही कारवाई केली जात आहे”, असा आरोप सध्या विरोधकांकडून होत आहे. दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी राज ठाकरे यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आल्यानंतर देखील सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली होती. “ईडीची चौकशी म्हणजे राजकीय दबावतंत्र आहे. जो आवाज उठवतो त्याचा आवाज दाबण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. “बाळासाहेबांचे संस्कार अजूनही जिवंत आहेत म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी आपला भाऊ राज ठाकरे यांची बाजू घेतली”, असेही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या होत्या.

“अशा संकटांमध्ये कुटुंबच पाठीशी उभे राहते. त्यामुळे राज ठाकरेंसोबत त्यांचे कुटुंब गेले यावर कोणी टीका करू नये”, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी अंजली दमानिया यांनी केलेल्या टीकेला नाव न घेता प्रत्युत्तर दिले होते. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विटच्या माध्यमातून राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ”राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार ईडीच्या चौकशीला निघालेत का सत्यनारायणाच्या पूजेला?”, अशी टीका अंजली दमानिया यांनी केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“ज्या दिवशी सरकार पडेल तेव्हा आम्ही पर्यायी सरकार देऊ” – देवेंद्र फडणवीस

News Desk

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघात, २ जणांचा मृत्यू

News Desk

सारथी जिवंत ठेवण्याबाबत महाविकास आघाडी व शरद पवारांची जबाबदारी – छत्रपती संभाजी राजे यांचे प्रतिपादन

News Desk